अपर नाशिक मिनिथॉन

By Admin | Updated: January 9, 2016 00:10 IST2016-01-09T00:09:32+5:302016-01-09T00:10:03+5:30

रोड रेसदोन गटांत स्पर्धा : सायली नाईक, प्रगती मुळाणे, तर मुलांमध्ये भारत मोटकरी, मयुर जुन्नरे प्रथम

Upper Nashik Minitron | अपर नाशिक मिनिथॉन

अपर नाशिक मिनिथॉन

इंदिरानगर : नाशिक जिल्हा स्पोर्ट आॅफिसर, नाशिक पंजाबी वेन्फेअर असोसिएशन, येस बँक व पीएमसी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने अपर नाशिक मिनिथॉन रोड रेसचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धा दोन गटांत घेण्यात आली. १५ वर्षांखालील वयोगटाची स्पर्धा गुरुगोविंद पब्लिक स्कूल ते पाथर्डीगाव, तर १७ वर्षांखालील वयोगटाची स्पर्धा गुरुगोविंद पब्लिक स्कूल ते पाथर्डीफाटा अशी घेण्यात आली. १५ वर्षांखालील वयोगटाची स्पर्धा चार कि.मी. मुलींमध्ये प्रथम सायली नाईक, द्वितीय साक्षी नाईक, तृतीय गौरवी चौधरी, तर मुलांमध्ये प्रथम भरत मोटकरी, द्वितीय तन्मय नाईकवाडे, तृतीय शुभम मुळाणे, १७ वर्षांखाली वयोगटात सात कि.मी. अंतरामध्ये प्रथम प्रगती मुळाणे, द्वितीय भारती गारले, तृतीय मयुरी पडवी, तर मुलांमध्ये प्रथम मयुर जुन्नरे, द्वितीय प्रदीप डोंगरे, तृतीय वैभव शिंदे आणि उत्कृष्ट सहभाग म्हणून सेट फ्रान्सिस हायस्कूल, हिंदी माध्यमिक विद्यालय, नाशिक केंब्रीज स्कूल आदिंसह विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व रोख स्वरूपात बक्षिसे देण्यात आली. सिद्धिविनायक स्कूलच्या विद्यार्थ्यांना विशेष सहभाग म्हणून सन्मानित करण्यात आले. मिनिथॉनमध्ये स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय, डे-केअर सेंटर, सुखदेव शाळेसह शहरातील सुमारे तीस शाळेंचे दोन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. व्यासपीठावर आमदार सीमा हिरे, महेश हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सावंत, कांता दराडे, मंदार पानसरे, शिल्पा
सराफ, सरदार गुरुदेव सिंग बिरदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Upper Nashik Minitron

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.