सप्तशृंगगडावर लवकरच अद्ययावत बसस्थानक: अनिल परब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 07:00 PM2020-02-15T19:00:58+5:302020-02-15T19:02:18+5:30

राज्यात लवकरच प्रवाशांच्या मागणीनुसार आवश्यक त्याठिकाणी नवीन बसस्थानक तयार करण्यात येणार आहेत. सप्तशृंगगडावर येणाऱ्या भाविकांची गैरसोय लक्षात घेऊन अद्यावत सुविधांयुक्त बसस्थानकाला प्राधान्य देणार असून, शासनस्तरावरून मंजुरी देणार असल्याची ग्वाही परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली.

Updated bus station at Saptasringa soon: Anil Parab | सप्तशृंगगडावर लवकरच अद्ययावत बसस्थानक: अनिल परब

सप्तशृंगगडावर देवीच्या पूजेप्रसंगी परिवहनमंत्री अनिल परब व इतर.

Next
ठळक मुद्देपरिवहन मंत्र्यांच्या हस्ते काकड आरती

कळवण/पांडाणे : राज्यात लवकरच प्रवाशांच्या मागणीनुसार आवश्यक त्याठिकाणी नवीन बसस्थानक तयार करण्यात येणार आहेत. सप्तशृंगगडावर येणाऱ्या भाविकांची गैरसोय लक्षात घेऊन अद्यावत सुविधांयुक्त बसस्थानकाला प्राधान्य देणार असून, शासनस्तरावरून मंजुरी देणार असल्याची ग्वाही परिवहनमंत्रीअनिल परब यांनी दिली.
गडावर शनिवारी पहाटे ३ वाजता परब यांच्या हस्ते देवीची काकड आरती करण्यात आली. यावेळी अंधेरीचे नगरसेवक मनोहर पांचाळ, शहापूरचे कार्यकर्त चेतन वाघ उपस्थित होते. देवस्थानच्या कार्यालयात भेट घेऊन उपसरपंच राजेश गवळी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांतर्फे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या उत्तर महाराष्ट्राचे आराध्यदैवत आदिमाया श्री सप्तशृंगी देवीच्या गडावर दर्शनासाठी संपूर्ण भारतातून लाखो भाविक वर्षभरात हजेरी लावतात. देवीच्या दर्शनासाठी येणारे जास्तीत जास्त भाविक हे बसचा वापर करतात. सध्या असलेले बसस्थानक असून नसल्यासारखे असल्याने येथे भाविकांसाठी कोणत्याच सुविधा नसून भाविकांची व स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय होते. सायंकाळी ६ नंतर येथून सुटणारी एकही बस नसल्याने बसच्या भरोशावर उशिराने आलेल्या भाविकांना रात्री मोठा आर्थिक भुर्दंड सहन करीत खासगी वाहनांनी प्रवास करावा लागतो. तसेच चैत्रोत्सव काळात धुळे, जळगाव, नंदुरबार, मध्य प्रदेश येथून लाखो भाविक पायी देवीच्या दर्शनासाठी येतात. दर्शन घेऊन बसने घरी परत जातात. त्यांचीही मोठी गैरसोय होते. त्यामुळे लवकरात लवकर येथे नवीन बसस्थानक तयार करावे, अशी मागणी होत आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके, तुषार बर्डे, प्रदीप कदम, राजेंद्र वाघ, प्रकाश कडवे, महेश पाटील, रमेश पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. आमदार नितीन पवार यांनीदेखील कळवण, सुरगाणा, सप्तशृंगगडावर सर्व सोयीसुविधांयुक्त बसस्थानक व परिसरात डांबरीकरण व नवीन बसेसची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यावेळी तहसीलदार बंडू कापसे, न्यासाचे सुदर्शन दहातोंडे, भिकन वाबळे, परिवहन विभागाचे नाशिक प्रमुख अहिरे, संदीप बेनके, गिरीश गवळी, शांताराम सदगीर, राजू वाघ, प्रदीप कदम, प्रकाश कडवे, अजय दुबे, नारायण अंगोरे, महेश पाटील, रमेश पवार, तुषार बर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Updated bus station at Saptasringa soon: Anil Parab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.