धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 00:10 IST2019-01-31T00:08:58+5:302019-01-31T00:10:38+5:30
ओझर : महाराष्ट्रभूषण व मानवता धर्माची शिकवण देणारे थोर समाजसुधारक निरुपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे अनावरण सरपंच जान्हवी कदम यांच्या हस्ते ओझर ग्रामपालिका कार्यालयात करण्यात आले. नानासाहेबांनी निरुपणाद्वारे अनेकांचे बुडते संसार वाचविले असून, त्यांचे कार्य आज त्याच गतीने पुढे नेत असल्याचे विशेष समाधान असल्याची भावना जान्हवी कदम यांनी व्यक्त केली.

ओझर येथे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेच्या अनावरणप्रसंगी बोलताना सरपंच जान्हवी कदम. समवेत माजी आमदार मंदाकिनी कदम, रज्जाक मुल्ला, प्रकाश महाले, दत्तात्रय देवकर आदी.
ओझर : महाराष्ट्रभूषण व मानवता धर्माची शिकवण देणारे थोर समाजसुधारक निरुपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे अनावरण सरपंच जान्हवी कदम यांच्या हस्ते ओझर ग्रामपालिका कार्यालयात करण्यात आले. नानासाहेबांनी निरुपणाद्वारे अनेकांचे बुडते संसार वाचविले असून, त्यांचे कार्य आज त्याच गतीने पुढे नेत असल्याचे विशेष समाधान असल्याची भावना जान्हवी कदम यांनी व्यक्त केली.
कार्यक्र मास माजी आमदार मंदाकिनी कदम, उपसरपंच रज्जाक मुल्ला, ग्रामपालिका सदस्य प्रकाश महाले, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय देवकर, रावसाहेब भडके, ग्रामपालिका कर्मचारी उपस्थित होते.ओझरच्या डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या कार्याची सर्वदूर माहिती आहे. प्रतिमा अनावरण सोहळ्याच्या दिवशी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत संपूर्ण ग्रामपालिका इमारतीची साफसफाई करीत संपूर्ण परिसर स्वच्छ केला. त्यानंतर कार्यस्थळ विविध फुलांनी सजवून आपल्या कार्याची चुणूक दाखवून दिली. याचीच चर्चा ओझरमध्ये रंगली होती.