प्लॅस्टिकबंदीच्या नावाखाली बाजारपेठ अस्थिर करण्याचा घाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 00:06 IST2018-06-24T00:06:08+5:302018-06-24T00:06:25+5:30
पर्यावरणाचा -हास होत असल्याच्या कारणावरून राज्य सरकारने प्लॅस्टिकबंदी आणली असून, शनिवार(दि. २३) पासून संपूर्ण राज्यभरात प्लॅस्टिकबंदीची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नाशिकमध्येही प्लॅस्टिकबंदीचे पडसाद उमटले.

प्लॅस्टिकबंदीच्या नावाखाली बाजारपेठ अस्थिर करण्याचा घाट
नाशिक : पर्यावरणाचा -हास होत असल्याच्या कारणावरून राज्य सरकारने प्लॅस्टिकबंदी आणली असून, शनिवार(दि. २३) पासून संपूर्ण राज्यभरात प्लॅस्टिकबंदीची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नाशिकमध्येही प्लॅस्टिकबंदीचे पडसाद उमटले. कापड आणि किराणा व्यावसायिकांसह प्लॅस्टिकवर आधारित व्यवसायचालकांनी प्लॅस्टिकबंदीच्या नावाखाली बाजारपेठ अस्थिर करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप करीत ब्रँडेड मालाला सशर्त परवानगी देऊन सर्वसामान्य व्यावसायिकांवर अन्याय केला जात असल्याची भावना व्यक्त केली. तर व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये पर्यायी व्यवस्थेशिवाय केलेल्या प्लॅस्टिकबंदीविषयी नाराजीचा सूर उमटत आहे. प्लॅस्टिकबंदीमुळे किराणा दुकानदारांसमोर किरकोळ मालाची विक्री कशी करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे. एक किंवा दोन किलोपेक्षा अधिक वजनाचे पुडे बांधणे शक्य होत नसल्याचे व्यापाºयांनी सांगितले. त्यामुळे बहुतांश दुकानांमध्ये प्लॅस्टिकमधील पॅकिंगच्या वस्तू जशाच्या तशा शनिवारीही दिसून आल्या. महापालिकेच्या आरोग्य विभागाने शनिवारी सकाळपासूनच प्लॅस्टिकचा वापर करणाºया दुकानदारांसह ग्राहकांवरही कारवाई सुरू केली असली तरी त्याचा परिणाम रस्त्यावर अनधिकृतपणे विविध वस्तूंची विक्री करणाºया विक्रेत्यांवरही दिसून आला नाही. रस्त्यावर विविध वस्तू प्लॅस्टिक वेष्टनासह विक्रीसाठी उपलब्ध होत्या, तर काही कापड व्यापारी आणि किराणा दुकानदारांनी कारवाईचा धसका घेत दुकानातील प्लॅस्टिक घाई गडबडीने हटविण्यास सुरुवात केल्याचे दिसून आले. दरम्यान, सरकारने घाईघाईने केलेली प्लॅस्टिकबंदी उद्योग व्यवसायाला मारक असून, टप्प्याटप्प्याने व प्लॅस्टिकला पर्याय निर्माण करून सरकारने प्लॅस्टिकबंदी करणे गरजेचे होते, असे मत व्यापा-यांनी व्यक्त केले. तसेच प्लॅस्टिकच्या वापरासाठी परवानगी मिळाल्यास त्याच्या पुनर्वापरासाठी संकलन करण्याची तयारीही व्यापाºयांनी दाखविली आहे.
प्लॅस्टिक सर्वांचीच गरज
बाजारातील दैनंदिन गरजेच्या प्लॅस्टिकच्या वस्तूंमध्ये ५० ते ६० टक्के भाग प्लॅस्टिक पिशव्यांचा असून, पिशव्या मिळत असल्याने त्यांचे महत्त्व सर्वांच्या लक्षात आले नव्हते. द्रवपदार्थांसह विविध किराणा मालातील वस्तू व दैनंदिन गरजांसाठी प्लॅस्टिक आवश्यक असून, त्याला समांतर पर्यायाशिवाय बंदी आणल्यामुळे सर्वांचीच गैरसोय होणार असल्याचे मत प्लॅस्टिक पिशव्यांचे वितरक आशिष बाफना यांनी व्यक्त केले आहे.