बेमोसमी पावसामुळे द्राक्ष बागांना तडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 17:48 IST2021-02-20T17:43:23+5:302021-02-20T17:48:48+5:30
पिंपळगाव बसवंत : परिसरात गुरुवारी (दि.१८) झालेल्या जोरदार बेमोसमी पावसाने शहरातील रानमळा शिवारासह जोपुळरोड परिसरात द्राक्षबागेच्या मण्यांना तडे गेले तर गव्हाच्या पिकांचे नुकसान झाले. यावेळी तलाठी राकेश बच्छाव, सहायक तलाठी अनिल पवार, कृषी अधिकारी यांनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली.

तलाठी, कृषी अधिकारी यांनी नुकसानग्रस्त द्राक्ष बागांसह गव्हाच्या पिकांची पाहणी केली.
पिंपळगाव बसवंत : परिसरात गुरुवारी (दि.१८) झालेल्या जोरदार बेमोसमी पावसाने शहरातील रानमळा शिवारासह जोपुळरोड परिसरात द्राक्षबागेच्या मण्यांना तडे गेले तर गव्हाच्या पिकांचे नुकसान झाले. यावेळी तलाठी राकेश बच्छाव, सहायक तलाठी अनिल पवार, कृषी अधिकारी यांनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली.
पिंपळगाव बसवंत शहरात अवकाळी पावसाच्या फटक्यात रानमळा शिवारातील द्राक्ष बागांना क्रकिंगचा फटका बसला. तर जोपूळ रोडवरील संजय खोडे यांची बाग भुईसपाट झाली आहे.
शिवाय शहरातील बहुतांश ठिकाणी गव्हाच्या पीकाचे या अवकाळी पावसाने काही प्रमाणात नुकसान केले असल्याने येथील तलाठी, कृषी अधिकारी यांनी नुकसानग्रस्त द्राक्ष बागांसह गव्हाच्या पिकांची पाहणी केली.