जवळके वणी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 17:17 IST2021-01-05T17:16:04+5:302021-01-05T17:17:29+5:30
दिंडोरी : तालुक्यातील जवळके वणी येथील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील पाटील गटाने एकत्र येत निवडणूक बिनविरोध करीत नवीन आदर्श निर्माण केला आहे.

जवळके वणी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध
जवळके वणी येथे दरवेळी शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यात चुरशीच्या निवडणूक होत होत्या. मात्र यावर्षी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येत निवडणूक बिनविरोध केली आहे. नऊ जागांवर एकमताने उमेदवारांची निवड केली. इतर उमेदवारांनी माघार घेतली. बिनविरोध निवड झालेल्या सदस्यांत वॉर्ड क्र.१ योगेश दवंगे, ज्योती बोंबले, मनीषा दवंगे, वॉर्ड क्र. २ मंगला गांगुर्डे, मोनिका बोंबले, उज्ज्वला दवंगे, वॉर्ड क्र. ३ विशाल बकरे, ज्ञानेश्वर दवंगे व स्वाती पाटील यांचा समावेश आहे.