संयुक्त जयंती महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 00:53 IST2020-02-23T23:02:29+5:302020-02-24T00:53:03+5:30

नृसिंह मंदिरात राष्ट्रीय चर्मकार महासंघ सिन्नर तालुका शाखेच्या वतीने संत रविदास महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचेही प्रतिमापूजन करण्यात आले. संयुक्त अभिवादन कार्यक्रम व विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला.

United Jubilee Festival | संयुक्त जयंती महोत्सव

सिन्नर येथे राष्टÑीय चर्मकार महासंघाच्या वतीने संयुक्त जयंती उत्सव व विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याप्रसंगी विद्यार्थ्यांसमवेत आमदार माणिकराव कोकाटे. समवेत शंकर तुपे, बाळासाहेब तुपे, बाळासाहेब हांडे, रामदास पठाडे, संजय वाघ, श्रावण वाघ, सुनील म्हैसधुणे, दत्तात्रय गोतिसे, प्रमोद घोलप आदी.

ठळक मुद्देसिन्नर : गुणगौरव सोहळा उत्साहात

सिन्नर : येथील नृसिंह मंदिरात राष्ट्रीय चर्मकार महासंघ सिन्नर तालुका शाखेच्या वतीने संत रविदास महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचेही प्रतिमापूजन करण्यात आले. संयुक्त अभिवादन कार्यक्रम व विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला.
ज्येष्ठ नागरिक शंकर तुपे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास व्यासपीठावर आमदार माणिकराव कोकाटे, भाजप तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे, महासंघाचे प्रदेश सचिव दत्तात्रय गोतिसे, जिल्हाध्यक्ष खंडेराव गांगुर्डे, सुंदराबाई मठ, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रामदास पठाडे, दत्ता वायचळे, आग्निशमन अधिकारी प्रवीण घोलप, सहायक अभियंता अजय सावळे, सुनील म्हैसधुणे, तालुकाध्यक्ष श्रावण वाघ, प्रमोद घोलप आदी उपस्थित होते.
आमदार कोकाटे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्तीप्राप्त व नवोदय विद्यालय प्रवेशपात्र विद्यार्थी दहावी, बारावी, इंजिनिअर, डॉक्टर, खेळाडू तसेच सेवानिवृत्त कर्मचारी व ज्येष्ठ नागरिकांचा गौरव करण्यात आला. पूजा वाघ हिने मनोगत व्यक्त केले. श्रावण वाघ यांनी तालुक्यातील सामाजिक अडचणी मांडल्या. संत रविदास मंदिरासाठी शासकीय जागेची मागणी नगरपालिकेकडे केली असल्याचे ते म्हणाले. संजय वाघ यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: United Jubilee Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.