विद्यार्थ्यांचा योगाचा अनोखा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 00:57 IST2020-01-12T23:33:25+5:302020-01-13T00:57:28+5:30

भोसला सैनिकी स्कूलच्या प्रांगणात रंगलेल्या अनोख्या आदित्य यागात युवकाने २५२५, युवतीने १३५०, ६८ वर्षांच्या आजोबांनी १६५० तर ५२ वर्षांच्या आजींनी ८५० सूर्यनमस्कार घालून दाखवत उपस्थित शेकडो विद्यार्थ्यांच्या उत्साहात भर घातली. त्यामुळेच हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत रंगलेल्या या अनोख्या उपक्रमात नाशिककरांनी २४ तासांत ४ लाख ३ हजार ३१३ सूर्यनमस्कारांची नोंद केली.

A unique yoga program for students | विद्यार्थ्यांचा योगाचा अनोखा उपक्रम

आदित्य यागादरम्यान सूर्यनमस्कार घालणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी.

ठळक मुद्देभोसला स्कूल : २४ तासांत घातले ४ लाखांवर सूर्यनमस्कार

नाशिक : भोसला सैनिकी स्कूलच्या प्रांगणात रंगलेल्या अनोख्या आदित्य यागात युवकाने २५२५, युवतीने १३५०, ६८ वर्षांच्या आजोबांनी १६५० तर ५२ वर्षांच्या आजींनी ८५० सूर्यनमस्कार घालून दाखवत उपस्थित शेकडो विद्यार्थ्यांच्या उत्साहात भर घातली. त्यामुळेच हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत रंगलेल्या या अनोख्या उपक्रमात नाशिककरांनी २४ तासांत ४ लाख ३ हजार ३१३ सूर्यनमस्कारांची नोंद केली.
चैतन्य योग साधना संस्था पुणे आणि भोसला मिलिटरी स्कूल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशकात नवव्या अनोख्या आदित्य यागाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध योगगुरू विश्वास मंडलिक यांच्या हस्ते झाले. अखंड २४ तास सूर्यनमस्कार प्रचार आणि प्रसार कार्यक्र मामध्ये भोसला मिलिटरी स्कूलचे सुमारे ५ हजार विद्यार्थी व आजूबाजूच्या शाळेचे सुमारे ३ हजार विद्यार्थी, यशवंत व्यायामशाळेचे अध्यक्ष दीपक पाटील तसेच व्यायामशाळेचे विद्यार्थी तसेच सूर्यनमस्कार, योगाप्रेमी आणि विविध वयोगटातील व्यक्तींनी या कार्यक्र मात सूर्यनमस्कार घालून आपापले योगदान दिले. सर्वांवर सूर्यनमस्काराचा संस्कार व्हावा, आपले शरीर निरोगी रहावे यासाठी आयोजित केलेला सामाजिक उपक्र म आहे. महापौर सतीश कुलकर्णी यांनी उपस्थित राहुन उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. सलग २४ तास चाललेल्या या नवव्या आदित्य यागात हजारो विद्यार्थ्यांनी मिळून सूर्यनमस्कारांचा विक्र म केला.
अविनाश अनपटचा विक्रम
अविनाश अनपट याने दोन हजार पाचशे पंचवीस इतके सूर्यनमस्कार एकट्याने घालून आतापर्यंतच्या सर्वात जास्त सूर्यनमस्कारांचा विक्र म केला. तर मुलीच्या गटात अमृता नारायण गोरे हिने एक हजार तीनशे पन्नास नमस्कारांचा विक्रम केला. तसेच वय वर्ष ६८ असलेल्या खिरे यांनी १६५० सूर्यनमस्कार आणि कुंदा गरु ड यांनी वयाच्या ५२व्या वर्षी ८५० सूर्यनमस्कार घालत सर्वांना अचंबित केले. या कार्यक्रमासाठी योग गुरू श्रीराम साठ्ये यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: A unique yoga program for students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.