शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शनी-मंगळ युतीचा आज अनोखा योग, स्फोटक घटना घडण्याचे ज्योतिषांचे भाकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 09:44 IST

astrology : मकर तारका समूहात मंगळवारी (दि.५) पहाटे पूर्व आकाशात तेजस्वी शनी व तांबूस मंगळ या दोन्ही ग्रहांची देखणी युती पाहायला मिळणार आहे.

नाशिक : मकर तारका समूहात मंगळवारी (दि.५) पहाटे पूर्व आकाशात तेजस्वी शनी व तांबूस मंगळ या दोन्ही ग्रहांची देखणी युती पाहायला मिळणार आहे. सोबतच काही अंतरावर तेजस्वी शुक्रही अनुभवता येणार असून, ही खगोलीय घटना उघड्या डोळ्यांनीही पाहता येणार असल्याचे खगोल अभ्यासकांनी म्हटले आहे. 

ज्योतिषतज्ज्ञ व पंचांगकर्त्यांच्या मते या कालावधीत काही स्फोटक घटना घडण्याचे भाकीत वर्तविण्यात आले आहे.  ५ एप्रिलच्या पहाटे पूर्व आकाशात तेजस्वी शनी आणि तांबूस मंगळ हे ग्रह एकमेकांच्या अगदी जवळ दिसणार असून, मकर तारका समूहात त्यांची देखणी युती पाहायला मिळणार आहे.  या दोघांमधील कोनीय अंतर ०.३ अंशांइतके कमी असेल. यांच्या सोबतच काही अंतरावर तेजस्वी शुक्रही पाहता येणार आहे. 

पृथ्वीवरून बघताना कधी-कधी  दोन  ग्रह, तारे, चंद्र  आदी एकमेकांजवळ आल्यासारखे दिसतात. त्याला ‘युती’  असे म्हटले जाते. प्रत्यक्षात हे घटक एकमेकांच्या जवळ असतीलच, असे नाही. मंगळ-शनी  युतीमध्येही दोन्ही ग्रह एकमेकांना जवळ दिसत असले, तरी प्रत्यक्षात मात्र ते एकमेकांपासून प्रचंड अंतरावर आहेत, असे खगाेल अभ्यासकांनी सांगितले. 

५ एप्रिलच्या  पहाटे साधारण ४:३० पासून सूर्योदयापर्यंत पूर्वेला ही युती उघड्या डोळ्यांनी पाहता येईल. द्विनेत्री किंवा दुर्बीण असल्यास हे दृश्य अधिक चांगले दिसू शकेल.   पहाटे लवकर उठून सुखद गारवा अनुभवत ही देखणी युती नक्की बघावी. - विनय जोशी, खगोल मंडळ, नाशिक.शनी व मंगळ हे मकर राशीतच आहेत. शनी हा २९ एप्रिल रोजी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे, तर ७ एप्रिल रोजी मंगळ हा ग्रह कुंभ राशीत जाणार आहे. मंगळ हा शेवटच्या अंशावर आहे. या युतीमुळे गेल्या काही दिवसांत उष्णतामान वाढल्याचे दिसून येते. या कालावधीत काही स्फोटक घडण्याची शक्यता आहे. - मोहनराव दाते, दाते पंचांगकर्ते, सोलापूर.

टॅग्स :Astrologyफलज्योतिषNashikनाशिकMaharashtraमहाराष्ट्र