शहरं
Join us  
Trending Stories
1
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
2
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
3
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
4
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
5
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार
6
Mumbai Crime: हाताच्या नसा कापल्या गेल्या अन्... पोलिसाच्या मृत्युचे कोडे उलगडले; पत्नी, मुलाला अटक
7
३.७ कोटी देऊन बॉयफ्रेंडच्या पत्नीसोबत केली तडजोड, पण नंतर घडलं असं काही, पैसेही गेले आणि... 
8
Gold Silver Price 24 September: नवरात्रीत सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, आता खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी?
9
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
10
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
11
भलीमोठी स्क्रीन, अल्ट्रा एचडी डिस्प्ले; सोनी कंपनीच्या टीव्हीवर थेट ५० हजारांची सूट!
12
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: ५ मिनिटांत होणारे गणेश स्तोत्र म्हणा, शाश्वत कृपा-लाभ मिळवा!
13
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
14
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
15
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
16
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
17
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
18
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
19
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?

स्वाध्याय परिवाराची अनोखी जलभक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 01:05 IST

ल हे केवळ माणसाचेच जीवन नाही, धरणी मातेचेही आहे. तहानलेल्या पृथ्वीला पाणी देणे, ते मुरवणे म्हणजे धरणी मातेला तृप्त करणेच होय. अशा भक्तिभावातून नाशिक जिल्ह्यात स्वाध्याय परिवाराचे अध्वर्यू पूजनीय आठवले शास्त्री ऊर्फ दादा यांच्या प्रेरणेतून काम सुरू झाले

नाशिक : जल हे केवळ माणसाचेच जीवन नाही, धरणी मातेचेही आहे. तहानलेल्या पृथ्वीला पाणी देणे, ते मुरवणे म्हणजे धरणी मातेला तृप्त करणेच होय. अशा भक्तिभावातून नाशिक जिल्ह्यात स्वाध्याय परिवाराचे अध्वर्यू पूजनीय आठवले शास्त्री ऊर्फ दादा यांच्या प्रेरणेतून काम सुरू झाले आणि निर्मल नीर, शोष खड्डे, विहिरीचे पुनर्भरण आणि छतावरील पावसाळी पाण्याचा दैनंदिन जीवनात वापर यासाठी हजारो प्रकल्प उभे राहिले. त्या माध्यमातून लाखो लीटर पाणी मुरवले जाते आणि काही पाण्याचा पुनर्वापरदेखील होत आहे.दिवसेंदिवस भूगर्भातील पाण्याचा साठा आटू लागला आणि पावसाचे प्रमाण कमी-अधिक झाले तसे निसर्गाला लहरी ठरवले गेले. मात्र, पाण्याची बचत करणे आवश्यक ठरू लागल्याने शासकीय स्तरावर कायदे होऊ लागले. तथापि, कोणत्याही कायद्याशिवाय स्वेच्छेने आणि शासकीय मदतीशिवाय जलबचत आणि संचयाचे काम नेटाने स्वाध्याय परिवाराने सुरू ठेवले आहे आणि बदलत्या काळात तीच मोठी गरज निर्माण झाली आहे.पूजनीय दादांनी साठ वर्षांपूर्वी हा विचार मांडला. देवाने ही सृष्टी निर्माण केली, ती मानवानेच बिघडवली आणि आता ती पूर्ववत करण्याची जबाबदारी मानवाचीच आहे. अशा प्रेरणेतून बाल तरू संवर्धनापासून जल चळवळीपर्यंतचे अनेक प्रकारचे कार्य भक्तीमार्गाने करण्याची शिकवण पूजनीय आठवले शास्त्री आणि पूजनीय धनश्री दीदी यांनी दिली. त्याच मार्गावरून स्वाध्यायी चालत आहेत. ते कोणत्याही प्रसिद्धी, पुरस्काराची अपेक्षा न ठेवता !नाशिकमध्ये स्वाध्याय परिवाराचे जलसंचयाचे काम १९९६ पासून सुरू आहे. मात्र गुजरातमध्ये त्याआधी परिवाराच्या काही अभियंत्यांनी जलसंचयाची कामे सुरू केली होती १२ मे १९९६ रोजी. पूज्य दादांनी नाशिकच्या काही स्वाध्यायींना मुंबईत गुजरातमधील काही स्वाध्यायींकडून जलसंचयाची माहिती घेण्यासाठी बोलावले आणि त्याचदिवशी त्यांच्याकडील माहिती घेतल्यानंतर तत्काळ तेथूनच ते नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील हरसूल येथे गेले. तेथील ग्रामस्थांना एकत्र करून पाण्याचे महत्त्व आणि त्यामागील भक्तिभाव समजावून सांगितला आणि त्यानंतर सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन श्रमभक्ती (श्रमदान) करून तलाव बांधला. हा नाशिकमधील पहिला ‘निर्मल नीर’ चा प्रयोग. त्यानंतर दिंडोरी, सटाणा, पेठ, सिन्नर यांसह सर्व जिल्ह्यांत निर्मल नीर बांधले गेले. त्याच जोडीला जमिनीची धूप थांबवून उतारावरून वाहणाऱ्या पाण्यातून वाहून जाणारी माती अडवून नंतर पाणी अडवण्यासाठी चेक डॅम बांधले जाऊ लागले. त्याचदरम्यान, परिवाराने घरगुती सांडपाणी आणि अन्य वापरलेले पाणी भूगर्भात भरण्यासाठी अनोखी चळवळ चालवली आणि घरांजवळ शोषखड्डे केले. त्यातून घराबाहेर वाहणारे पाणी थांबले आणि आरोग्याचा प्रश्नही सुटला.पंचमहाभुते आपले कर्तव्य नियमितपणे करीत असतात, त्यालाच यज्ञ असे म्हणतात अशा शिकवणीतून मग पावसाचे पाणी पडल्यावर ते वाहून जाण्यापेक्षा तहानलेल्या भूमातेला देण्यासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंगचे काम १९९६ पासूनच सुरू झाले. छतावरील पाणी हे कूपनलिकेजवळ सोडून वापरविणे किंवा भूजल पातळी वाढविण्यासाठी सोडणे हे काम सामान्यच आहे. वेगळेपण स्वाध्यायींनी दाखवून दिले आहे. नाशिक शहरातच अशाप्रकारचे पाचशे पावसाळी पाणी संचय उपक्रम राबविले आहेत.सर्व उपक्रमांची वैशिष्ट्ये म्हणजे परिवार म्हणून ते राबविताना सर्वजण दैवी भातृभावाच्या भावनेने एकमेकांना सहकार्य करतात. मातृसंस्थेकडून पाईप, सीमेंट वगैरे विविध प्रकारचे साहित्य नम्रपणे ‘प्रसाद’ म्हणून स्वीकारतात. नाशिक जिल्ह्यातील अशा कामांसाठी तब्बल परिवारातील चाळीस स्वाध्यायी अभियंते सहकारी ‘एकमेका सहाय्य करू..’ या उक्तीने मार्गदर्शन करतात. सरकारी कायद्यामुळे, भीतीमुळे काम होऊ शकते. परंतु प्रेरणा, भक्तिभाव आणि स्वेच्छेने काम झाले तर ते अधिक आत्मियतेने होते आणि टिकून राहाते, हेच स्वाध्याय परिवाराने दाखवून दिले आहे.१९९६ पासून सुरू केलेल्या या कार्याची फलश्रुती मोठी आहे. संपूर्ण जिल्ह्यात २२२ निर्मल नीर, १४ हजार ५५३ शोषखड्डे, ९ हजार ९९८४ चेक डॅम आणि ३ हजार ९३० विहिरी, कूपनलिकांच्या पुनर्भरणाचे उपक्रम राबविण्यात आले असून, पाचशेहून अधिक घरांवर पावसाळी पाणी साठवण आणि पुनर्वापर केला जात आहे.

टॅग्स :WaterपाणीDamधरण