मुक्तानंद विद्यालयाची अनोखी आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 11:30 PM2021-08-01T23:30:16+5:302021-08-01T23:31:30+5:30

येवला : शहरातील श्रीगुरूदेव शिक्षण प्रसारक मंडळ सचंलित स्वामी मुक्तानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने यंदा लोकमान्य टिळक स्मृतीशताब्दी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्ष निमित्ताने कवि संमेलनाचा अनोखा उपक्रम राबविला.

Unique tribute to Muktanand Vidyalaya | मुक्तानंद विद्यालयाची अनोखी आदरांजली

मुक्तानंद विद्यालयाची अनोखी आदरांजली

Next
ठळक मुद्देयेवला : ऑनलाईन कविसंमेलनात कवितांचा पाऊस

येवला : शहरातील श्रीगुरूदेव शिक्षण प्रसारक मंडळ सचंलित स्वामी मुक्तानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने यंदा लोकमान्य टिळक स्मृतीशताब्दी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्ष निमित्ताने कवि संमेलनाचा अनोखा उपक्रम राबविला.

घरी राहूनच मुला मुलींनी आपल्या काव्यरचना सादर केल्या. आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेत सकाळी ९ ते ११ या वेळेत गुगल मीटव्दारे ऑनलाईन कविसंमेलन साजरे झाले. दोन गटातून झालेल्या या कविसंमेलनात आई, पर्यावरण, माझी शाळा, कोरोना, लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे या सहा विषयांवर विद्यार्थ्यांनी आपल्या रचना सादर केल्या व रसिकांकडून उत्स्फुर्त प्रतिसादही मिळवला.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य मुरलीधर पहिलवान, उपप्राचार्य गजेंद्र धिवर यांचे हस्ते करण्यात आले. संस्थेचे सेक्रेटरी दीपक गायकवाड यांनी कवी संमेलनाचे उद्घाटन केले. तसेच संमेलनाध्यक्ष डॉ. अमृत पहिलवान व विशेष अतिथी कवयित्री लता निकम यांनीही कविता सादर केली. प्रसाद कुळकर्णी, सह्याद्री निकम हिने मनोगत व्यक्त केले.

पाचवी ते सातवी या गटातून सृष्टी जाधव, प्रेरणा ढुमणे, प्राप्ती माळोकर, सिद्धी काळे, जयदीप माळोकर, व्यंकटेश पहिलवान तसेच आठवी ते दहावीच्या गटातून कोमल पवार, रिद्धि बंकापुरे, प्राची बनछोड, अनंत कुळकर्णी, अमित अलगट, मंथन पहिलवान विजेते ठरले. नंतर रंगलेल्या कविसंमेलनात ५१ स्पर्धकांनी आपल्या रचना सादर केल्या. 

Web Title: Unique tribute to Muktanand Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.