मनपा कर्मचाऱ्यांच्या गणवेश भत्त्यात दुप्पट वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 01:07 AM2020-02-12T01:07:33+5:302020-02-12T01:08:51+5:30

महापालिकेच्या विविध विभागात काम करणाºया आणि कामाच्या अनुषंगाने गणवेश असणाºया कर्मचाऱ्यांच्या गणवेश भत्त्यात वाढ करून त्यांना दुप्पट भत्ता देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने महासभेपुढे ठेवला आहे. येत्या १८ फेबु्रवारीस महासभा होणार असून, त्यात यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे.

Uniform allowance of municipal employees to double | मनपा कर्मचाऱ्यांच्या गणवेश भत्त्यात दुप्पट वाढ

मनपा कर्मचाऱ्यांच्या गणवेश भत्त्यात दुप्पट वाढ

Next
ठळक मुद्देप्रस्ताव : फायरमनला पाच हजार रुपये

नाशिक : महापालिकेच्या विविध विभागात काम करणाºया आणि कामाच्या अनुषंगाने गणवेश असणाºया कर्मचाऱ्यांच्या गणवेश भत्त्यात वाढ करून त्यांना दुप्पट भत्ता देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने महासभेपुढे ठेवला आहे. येत्या १८ फेबु्रवारीस महासभा होणार असून, त्यात यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे.
प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार वैद्यकीय विभागात कार्यरत कर्मचाºयांच्या सध्याच्या गणवेश भत्त्यात वाढ करून दरमहा पन्नास रुपयांऐजी शंभर रुपये देण्यात येणार आहे. गणवेशासाठी वर्षाकाठी १२०० रुपये मिळणार आहेत. तर अग्निशमन विभागात कार्यरत कर्मचाºयांनादेखील शासनाच्या वनविभागाच्या धर्तीवर दरवर्षी गणवेश आणि सुरक्षा साहित्यासाठी अडीच हजाराऐवजी पाच हजार रुपये दिले जाणार आहेत. दरम्यान, अग्निशमन विभागात कार्यरत असलेल्या फायरमनलादेखील अल्प रक्कम यापूर्वी दिली जात होती. त्यातही दुपटीने वाढ करण्यात येणार आहे. गणवेश कापड, रेनकोट, गमबूट, मोजे तसेच गणवेश शिलाईसाठी आता एकरकमी पाच हजार रुपये वर्षाला दिले जाणार आहेत.
वैद्यकीय विभाग
वैद्यकीय विभागातील हेड नर्स, स्टाफ नर्स, एएनएम, जीएनएम, असिस्टंट मेट्रन या संवर्गातील कर्मचाºयांना गणवेशासाठी पूरक कापड, साड्या आणि इतर साहित्यासाठी वेतनातच दरमहा ५० रु पये अदा केले जाते. सदरची रक्कम देण्याचा निर्णय २००६ पूर्वीचा आहे. त्याचप्रमाणे अनेक वर्षांत वैद्यकीय विभागातील कर्मचाºयांच्या भत्त्यात वाढ झालेली नव्हती. त्यामुळे त्यांच्या गणवेश भत्त्यात दुपटीने वाढ केली जाणार असून, त्याचा तीनशे कर्मचाºयांना लाभ होणार आहे.

Web Title: Uniform allowance of municipal employees to double

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.