अज्ञाताचा रेल्वेतून पडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 00:26 IST2021-01-14T00:25:04+5:302021-01-14T00:26:36+5:30
चांदवड : तालुक्यातील वाकी खुर्द शिवारात मुंबई-नाशिक-मनमाड रेल्वे लाईनवर बुधवारी (दि. १३) सकाळी आठच्यासुमारास ४५ ते ५० वर्षीय अज्ञाताचा रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अद्याप त्याची ओळख पटलेली नाही.

अज्ञाताचा रेल्वेतून पडून मृत्यू
चांदवड : तालुक्यातील वाकी खुर्द शिवारात मुंबई-नाशिक-मनमाड रेल्वे लाईनवर बुधवारी (दि. १३) सकाळी आठच्यासुमारास ४५ ते ५० वर्षीय अज्ञाताचा रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अद्याप त्याची ओळख पटलेली नाही.
त्याच्या अंगात पांढऱ्या रंगाचा लायनिंगचा शर्ट व काळसर फुल पॅन्ट व निळसर रंगाची अंडरपॅन्ट व उजव्या हातात लाल दोरा बांधलेला आहे. उजव्या हाताच्या कांबीवर मराठीत ह्यभगीरथह्ण असे नाव व हनुमानाचे चित्र गोंदलेले आहे. चांदवड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या वर्णनाच्या व्यक्तीबाबत कोणास काही माहिती असल्यास चांदवड पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक कैलास जगताप यांनी केले आहे .