नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात अज्ञात व्यक्तीचा धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 10:08 IST2018-10-05T09:41:37+5:302018-10-05T10:08:05+5:30

नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात मध्यरात्री 3 वाजता एका अज्ञात व्यक्तीने धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे.

An unidentified person attack Nashik district hospital | नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात अज्ञात व्यक्तीचा धुमाकूळ

नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात अज्ञात व्यक्तीचा धुमाकूळ

नाशिक - नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात मध्यरात्री 3 वाजता एका अज्ञात व्यक्तीने धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे. तसेच अज्ञाताने रुग्णालयातील नर्स आणि रुग्णांना मारहाण करण्याचाही प्रयत्न केला. 

जिल्हा रुग्णालयाच्या काचा फोडण्याबरोबरच अज्ञाताने  कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ केली. काही रुग्णांच्या नातेवाईकांवर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेच्या वेळी रुग्णालयातील पोलीस झोपलेले होते. काही रुग्णांच्या नातेवाईकांनी व्यक्तीला पकडून सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात दिले. ही व्यक्ती मनोविकृत असल्याचा संशय आहे.

Web Title: An unidentified person attack Nashik district hospital