The unfortunate end of the climber Arun Sawant | गिर्यारोहक अरुण सावंत यांचा दुर्दैवी अंत

गिर्यारोहक अरुण सावंत यांचा दुर्दैवी अंत

नाशिक : हरिश्चंद्रगडावर ट्रेकिंगसाठी आलेले ज्येष्ठ गिर्यारोहक अरुण सावंत यांचा अपघात होऊन निधन झाले. त्यांच्यासोबत असलेल्या ३० अन्य ट्रेकर्सपैकी सुमारे ११ सहभागी सदस्यांना नाशिकच्या ट्रेकर्सच्या चमूने सुखरूप खिरेश्वर गावात आणले. सह्याद्रीच्या खोऱ्यातील विविध गड-किल्ल्यांवरील अवघड वाटा सर करणारे अभ्यासू गिर्यारोहक अरुण सावंत यांचा डोंगरदºयाच्या कुशीतच अपघातीमृत्यू झाला. त्यांचा मृतदेह रविवारी (दि. १९) आढळून आला. सावंत हे तीस गिर्यारोहकांच्या गु्रपला घेऊन हरिश्चंद्रगडावर शनिवारी रॅपलिंगकरिता पोहचले होते.
रॅपलिंगचा पहिला टप्पा पूर्ण करून त्यांच्या ग्रुपचे गिर्यारोहक खाली आले तेव्हा तेदेखील रॅपलिंगद्वारे कोकणकड्यावरून खाली येत होते; मात्र अचानकपणे त्यांचा ग्रुपशी संपर्क तुटला आणि ते संध्याकाळी बेपत्ता झाले. कोकणकड्याची सुमारे दोन हजार फूट उंची आहे. कोकणकड्यापासून जिथून सावंत यांचा संपर्क तुटला ती उंची एक हजार फुटांची आहे.
रॅपलिंग करून खाली आलेल्या त्यांच्या ग्रुपच्या सदस्यांना ‘ट्रेकसोल’च्या नाशिक येथील गिर्यारोहक जे कॅम्पेनिंगकरिता थांबलेले होते. त्यांनी सकाळी रोहिदास गडावर ट्रेकिंगचा बेत रद्द करत सावंत ग्रुपचे गिर्यारोहक रॅपलिंगद्वारे खाली गेलेले आहे, त्यांना ‘रेस्क्यू’ करत वरच्या बाजूने सुरक्षित बाहेर काढण्याचा ‘टास्क’ हाती घेतला.
सर्व अत्यावश्यक साधने असल्यामुळे डॉ. अजय धोंडगे, डॉ. अजय जाधव, डॉ. हेमंत बोरसे, प्रसाद कुलकर्णी यांनी रविवारी सकाळी ११.३० वाजेपर्यंत त्या ग्रुपच्या एकूण ११ सदस्यांना सुखरूप ठाणे जिल्ह्णातील खिरेश्वर गावात आणले. हे सर्व ट्रेकर्स रात्री मुक्कामी गडावर थांबलेले होते.
रविवारी त्यांचा रोहिदास गड चढण्याचा बेत होता; मात्र सावंत यांची दुर्दैवी घटना घडल्याने त्यांनी तो रद्द केला. हे नाशिककर गिर्यारोहक मूळ वैनतेय गिरीभ्रमण संस्थेशी जोडलेले आहे. डोंगरांवर झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये हौशी पर्यटकांचा अधिक समावेश आहे. गिर्यारोहकांचा अपवादानेच अपघाती मृत्यू घडले आहेत, मात्र त्याचे प्रमाण हे अत्यंत कमी असल्याचे वैनतेय संस्थेचे प्रशांत परदेशी यांनी सांगितले. सावंत हे मुरब्बी गिर्यारोहकांपैकी एक होते. त्यांचा अपघाती मृत्यू होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे परेदशी म्हणाले.

Web Title: The unfortunate end of the climber Arun Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.