सटाणा येथील अभियंत्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू दुर्घटना : झाडावर आदळली कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 00:17 IST2018-04-02T00:17:24+5:302018-04-02T00:17:24+5:30

सटाणा : कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात येथील सार्वजनिक बांधकाम विभागचे शाखा अभियंता सुनीलकुमार निंबा देसले (४४) यांचा मृत्यू झाला.

Unfortunate death accident in Engineer of Satana: Accidental car on tree | सटाणा येथील अभियंत्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू दुर्घटना : झाडावर आदळली कार

सटाणा येथील अभियंत्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू दुर्घटना : झाडावर आदळली कार

सटाणा : कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात येथील सार्वजनिक बांधकाम विभागचे शाखा अभियंता सुनीलकुमार निंबा देसले (४४) यांचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी रात्री साक्री-नामपूर रस्त्यावरील टेंभे खालचे नजीक झाला. सार्वजनिक बांधकाम विभागात शाखा अभियंता म्हणून सुनीलकुमार देसले हे कार्यरत होते़ केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांचे वडील रामराव पाटील यांचे निधन झाल्याने देसले हे त्याच्या अंत्ययात्रेसाठी धुळे जिल्ह्यातील मालपूर येथे कारने गेले होते. अंत्यविधी आटोपून परतत असताना साक्र ी-नामपूर रस्त्यावरील टेंभे खालचे नजीक वळण रस्त्यावर समोरून आलेल्या वाहनाला वाचवण्याच्या नादात त्यांची कार झाडावर आदळली यात देसले यांचा मृत्यू झाला. जायखेडा पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली आहे. मितभाषी देसले हे धुळे जिल्ह्यातील कासारा येथील मूळ रहिवासी होते. त्यांच्या पार्थिवावर मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, सहा वर्षाची मुलगी, तीन वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.

Web Title: Unfortunate death accident in Engineer of Satana: Accidental car on tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात