शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
6
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
7
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
8
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
9
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
10
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
11
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
12
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
13
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
14
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
15
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
16
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
17
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
18
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
19
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
20
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी

नववर्ष स्वागताचा अनुपम सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 1:01 AM

नाशिक : भल्या सकाळी रांगोळ्या आणि पताक्यांनी सजविलेले रस्ते, त्यानंतर ढोल-ताशांच्या निनादात ब्रह्मध्वज नाचवत निघालेले तरुण आणि पारंपरिक वेशभूषेत असलेल्या महिलांचे नृत्य अन् मर्दानी खेळ... विविध रस्त्यांवरून निघालेल्या स्वागतयात्रांमुळे नाशिककरांनी रविवारी (दि.१८) आगळीवेगळी उत्साहवर्धक सकाळ अनुभवली.

ठळक मुद्दे गुढीपाडवा : शहरात घुमला ढोल-ताशांचा गजर ठिकठिकाणी प्रबोधनाची गुढी

नाशिक : भल्या सकाळी रांगोळ्या आणि पताक्यांनी सजविलेले रस्ते, त्यानंतर ढोल-ताशांच्या निनादात ब्रह्मध्वज नाचवत निघालेले तरुण आणि पारंपरिक वेशभूषेत असलेल्या महिलांचे नृत्य अन् मर्दानी खेळ... विविध रस्त्यांवरून निघालेल्या स्वागतयात्रांमुळे नाशिककरांनी रविवारी (दि.१८) आगळीवेगळी उत्साहवर्धक सकाळ अनुभवली. चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा शहर व परिसरात जल्लोषपूर्ण वातावरणात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. नागरिकांनी आपापल्या घरांवर गुढी उभारून हिंदू नववर्ष साजरा केला. रविवारपासून शालिवाहन शके १९४०ला प्रारंभ झाला. गुढीपाडव्याच्या सणानिमित्त शहरातील विविध भागांमध्ये पारंपरिक स्वागतयात्रांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी दिनकराच्या साक्षीने ढोल-ताशांच्या गजरात रस्त्यांवरून स्वागतयात्रांचा जल्लोष पहावयास मिळाला. घरोघरी गुढ्या उभारून आणि तोरणे बांधून दरवर्षीच हिंदू नववर्षाचा प्रथम दिन साजरा केला जातो. परंतु गेल्या काही वर्षांनी शहराच्या विविध भागांत पारंपरिक वेशभूषेत निघणाऱ्या नववर्ष स्वागतयात्रा, त्यात सहभागी धार्मिक संस्था आणि आधुनिकतेची कास धरत निघणाºया दुचाकीफेºया यामुळे वातावरणाचा नूरच बदलून जातो. पाडव्याचा दिवस, त्यातच रविवारची सुटी असल्याने शहरातून तब्बल पंधरा ते वीस ठिकाणांहून स्वागतयात्रा निघाल्या. भद्रकालीतील साक्षी गणेश, इंदिरानगर, गंगापूररोड, सातपूर, कॉलेजरोडवरील कुलकर्णी चौक अशा विविध ठिकाणी निघालेल्या यात्रांनी शहराच्या उत्सवी वातावरणात उत्साहाची भर घातली. पारंपरिक वेशभूषेत ब्रह्मध्वज खांद्यावर घेऊन निघालेल्या पुरुष मंडळीबरोबरच महिलाही सहभागी झाल्या होत्या. लेजीम पथके, ढोल पथके, महापुरुषांच्या वेशभूषेतील युवक, बालकांनी लक्ष वेधून घेतले.मंदिरातून पर्यावरण संवर्धनाचा संदेशचांदीच्या गणपती मंदिरात गुढीपाडव्यानिमित्त गुढी उभारण्यात आली होती. विशेष म्हणजे गणरायांच्या मूर्तीभोवती गुढ्या उभारून प्रत्येक गुढीवर पर्यावरणाविषयी प्रबोधन करणारे संदेशांचे फलक झळकविण्यात आले होते. ‘पर्यावरणासाठी झाडे लावा, देश वाचवा’, ‘झाडे-झुडुपे नका करू नष्ट, श्वास घ्यायला होतील कष्ट’ यासह शांती व अन्नाचा आदर याविषयीचेही घोषवाक्यांचे फलक लावण्यात आले होते.भक्तांच्या गर्दीने बहरला गोदाकाठनववर्ष स्वागतासाठी शहरात सर्वत्र भगवे वातावरण निर्माण झाले असतानाच गोदाकाठी भक्तांची मांदियाळी जमली होती. शहरातून निघालेल्या या धार्मिक मिरवणुकीतून हजारो भाविक गोदाकाठी एकत्र आले. धार्मिक पूजापाठ करून त्यांनी नववर्ष स्वागत केले. नरेंद्राचार्य महाराज संस्थान तथा जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज भक्तसेवा मंडळ नाशिक यांच्या वतीने सकाळी शहरातून सवाद्य शोभायात्रा काढण्यात आली. रविवार कारंजा परिसरात नववर्ष स्वागताचा जल्लोषनववर्ष स्वागतयात्रा समितीकडून स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मागील चार वर्षांपासून या भागातून स्वागतयात्रा काढण्याची परंपरा पाळली जात आहे. राज्य सराफ सुवर्ण महासंघाचे गिरीश टकले, अ‍ॅड. नितीन बाबूराव ठाकरे यांच्या हस्ते गुढीचे पूजन करण्यात आले. साक्षी गणपती मंदिरापासून यात्रेला प्रारंभ करण्यात आला. यात्रा गाडगे महाराज पुतळा, मेनरोडने धुमाळपॉर्इंटवरून रेडक्रॉस सिग्नल, एम.जी. रोडवरून वकीलवाडी, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, मेनरोडवरून चांदवडकर लेन, दिल्ली दरवाजामार्गे भाजी पटांगणावर पोहचली. या यात्रेचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे १ कि.मी. रांगोळी. यात्रा मार्गावर सहभागी महिला रांगोळी काढत होत्या. विविध धार्मिक-सांस्कृतिक संस्थांचे एकूण १५ चित्ररथ यात्रेत सहभागी झाले होते. ढोलवादन, मंगळागौर खेळ, दुचाकीस्वार महिलांनी लक्ष वेधले.