शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

‘नाफेड’च्या अध्यक्षांकडून कांदा खरेदी केंद्रांवर अचानक पाहणी; अनेक दोष आढळले

By दिनेश पाठक | Updated: June 21, 2024 15:08 IST

खासगी दौऱ्याचे कारण सांगून पंचनामा; अधिकाऱ्यांकडून सासवासारव

नाशिक : अधिकारी व व्यापारी यांची साखळी तयार होऊन नाफेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांची होत असलेली फसवणूक तसेच ‘नाफेड’शिवाय ‘एनसीसीएफ’च्या कांदा खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांनी फिरविलेली पाठ याचा पंचनामा नाफेडचे अध्यक्ष जेठाभाई अहीर यांनी केला. त्यांनी नाशिक जिल्ह्यातील नाफेडच्या कांदा खरेदी-विक्री केंद्रांवर अचानक पाहणी केली. या पाहणीत त्यांना अनेक दोष आढळून आले. अध्यक्षांकडून कांदा खरेदी केंद्रांची पाहणी होत असल्याची भनक नाफेडशिवाय कृषी अधिकाऱ्यांनाही लागली नाही. प्राप्त माहितीनुसार खासगी दौऱ्याचे कारण सांगून अध्यक्ष नाशिक जिल्हा दौऱ्यावर आले होते.

देवळा येथील नाफेडच्या कांदा खरेदी केंद्रावर अध्यक्ष जेठाभाई अहीर शुक्रवारी (दि.२०) सकाळी अकरा वाजता पोहोचले. ग्रामीण भागातील एका केंद्रावरही ते पोहोचले. अध्यक्षच अचानक आल्याने तेथे उपस्थित नाफेडच्या अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. आतापर्यंत खरेदी केलेल्या कांद्याचा हिशेब अध्यक्षांनी तपासला. तसेच शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी का झाला? म्हणून अधिकाऱ्यांनाही जाब विचारले. तेथील अधिकाऱ्यांनी बाजार समितीपेक्षा आपल्याकडे कांद्याला भावच कमी असल्याचे सांगून नामनिराळे राहण्याचा प्रयत्न केला. कांदा प्रश्नांबाबतीत तक्रार करण्यात आली होती त्यामुळे अध्यक्षांनी कोणासही काही न सांगता आपला चौकशी दौरा केला.

चौकशीत काय आढळले- शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी न करता बाजार समितीतून कांदा खरेदी केला जात हाेता- ऑनलाईन कांदा खरेदी विक्रीमध्ये घोटाळा आहे का? याचे बारकावे अध्यक्षांनी तपासले.- विक्री केलेल्या मालापेक्षा दुप्पट कांदा गोडावूनमध्ये आढळून आला.- ५ ते ६ खरेदी खरेदी केंद्रांवर चुकीच्या पध्दतीने काम सुरू असल्याचे दिसले- आधारकार्डवर शिक्के मारुन ऑनलाइन खरेदी विक्री व्यवहारात गडबडीचा संशय- कांदा खरेदी विक्री व्यवहारात दलाली होत असल्याचा अध्यक्षांना संशय

काय म्हणाले नाफेडचे अध्यक्षशेतकऱ्यांना दुप्पट नफा देण्यासाठी नाफेडची स्थापना करण्यात आली आहे. काही गोष्टी घडायला नको ते देखील चाैकशीत आढळून आले आहे. कांदा खरेदी विक्री व्यवहारात दलाली होत असल्याने शेतकऱ्यांना पूर्ण पैसे मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांची आहे. बाजार समितीतून कांदा माल खरेदी करणे अवघड आहे पण आम्ही, याबाबतीत विचार करत असल्याचे नाफेडचे अध्यक्ष जेठाभाई अहीर म्हणाले.

अध्यक्षांनी पाहणी करताच भावात उच्चांकनाफेडचे अध्यक्ष जेठाभाई अहीर यांनी नाशिक जिल्ह्यातील नाफेडच्या कांदा खरेदी विक्री केंद्रांवर अचानक पाहणी करताच शुक्रवारचे (दि.२१) कांद्याचे दर नाफेडच्या केंद्रांवर थेट ३०७४ पर्यंत गेले. हा यंदाचा भावाचा उच्चांक आहे. पहिल्या दिवसापेक्षा २०० रूपयांची भाववाढ झाली, मात्र तरीही बाजार समितीपेक्षा २०० रूपये भाव नाफेडचा कमीच आला. दोघाकडील भाव लवकरच समान होतील, असा विश्वास अध्यक्षांनी व्यक्त केला.

टॅग्स :onionकांदाNashikनाशिक