अडीच महिन्यांनी बाधित हजाराखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 01:31 AM2021-05-22T01:31:01+5:302021-05-22T01:31:53+5:30
जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २१) नवीन ९५५ कोरोनाबाधित आढळले असून, एकूण २३९४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
![Under two and a half months affected | अडीच महिन्यांनी बाधित हजाराखाली Under two and a half months affected | अडीच महिन्यांनी बाधित हजाराखाली](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/corona-virus121_202006432852.png)
अडीच महिन्यांनी बाधित हजाराखाली
Next
नाशिक : जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २१) नवीन ९५५ कोरोनाबाधित आढळले असून, एकूण २३९४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अडीचपट असली तरी जिल्ह्यात ४६ जणांचा बळी गेल्याने आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या ४२८० वर पोहोचली आहे. जिल्ह्यात कोरोनामुक्त नागरिकांची संख्या सातत्याने बाधितांच्या तुलनेत अधिक रहात आहे. त्यामुळेच शुक्रवारी एकूण उपचारार्थी रुग्णांच्या संख्येत अजून घट होऊन ही संख्या १६२२१ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये ४६८, तर नाशिक ग्रामीणला ४६५ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात २२ रुग्ण बाधित आहेत.