कर्ज देण्याच्या बहाण्याने पावणेतीन लाखांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 01:07 IST2020-08-10T01:06:49+5:302020-08-10T01:07:09+5:30
कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध क रून देण्याच्या आमिषाने एका मध्यस्थासह दहा व्यक्तींना सुमारे पावणेतीन लाखांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

कर्ज देण्याच्या बहाण्याने पावणेतीन लाखांना गंडा
नाशिक : कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध क रून देण्याच्या आमिषाने एका मध्यस्थासह दहा व्यक्तींना सुमारे पावणेतीन लाखांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अनिल बजिराणी (रा. अंधेरी, मुंबई) असे गंडा घालणाऱ्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी रानू सुनील पाटील (रा. डीजीपीनगर-२) यांनी तक्र ार दाखल केली आहे. तक्रारीनुसार बजिराणी याने पाटील यांना त्याच्या ग्लोबल ट्रस्ट सर्व्हिसेस या फायनान्स कंपनीत नोकरी दिल्याचे भासविले. तसेच त्यांना कमी व्याजदारात कर्जवितरण करण्याचे आमिष दाखवून गरजू कर्जदारांना जमा करण्यास सांगितले. त्याप्रमाणे पाटील यांनी अशा इच्छुकांची बजिराणीसोबत भेट घालून
दिली. संशयितांनी सर्वांकडून कर्ज प्रकरण प्रोसेसिंग फी तसेच इतर कारणे देत आठ हजार ते ७० हजारांपर्यंतची रक्कम घेतली. अशा एकूण दहा इच्छुकांकडून सुमारे २ लाख ८३ हजार ७५० रुपयांची रक्कम गोळा
केली. पंरतु कोणालाही कर्ज दिले नाही. अनेक या संदर्भात तपास करण्याचा प्रयत्न केला असता कुणालाही कर्ज उपलब्ध झाले नसल्याचे लक्षात आले.
यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पाटील व इतर गुंतवणूकदारांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली असून, या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पी. बी. बाकले करत आहेत.