शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

आगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार

By श्याम बागुल | Updated: October 16, 2018 16:07 IST

मराठवाड्यातील जायकवाडी धरणात १७२ दशलक्ष घनफूट पाण्याची कमतरता असल्यामुळे समन्यायी पाणी वाटपानुसार नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांमधून किमान ६ टीएमसी पाणी सोडण्याचे प्रयत्न गोदावरी पाटबंधारे महामंडळाकडून सुरू झाले

ठळक मुद्दे‘गंगापूर’मधून पाणी देण्यास विरोध; तीन वर्षांची होणार पुनरावृत्ती

नाशिक : ‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास’ अशी परिस्थिती यंदा पावसाअभावी नाशिक जिल्ह्यावर ओढवलेली असताना त्यात समन्यायी पाणी वाटपाचा आधार घेत गंगापूर धरणातून पाणी पळविण्याचा मराठवाड्याकडून होणारा प्रयत्न पाहता आगामी निवडणुकीत नाशिक व नगर जिल्ह्यात ‘गोदावरी’चे पाणी पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये पिके करपून, पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्यामुळे गंगापूरचे पाणी अन्य जिल्ह्यासाठी सोडल्यास तीन वर्षांपूर्वीच्या राजकीय तणावाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.मराठवाड्यातील जायकवाडी धरणात १७२ दशलक्ष घनफूट पाण्याची कमतरता असल्यामुळे समन्यायी पाणी वाटपानुसार नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांमधून किमान ६ टीएमसी पाणी सोडण्याचे प्रयत्न गोदावरी पाटबंधारे महामंडळाकडून सुरू झाले आहेत. सोमवारी या संदर्भात झालेल्या बैठकीत गोदावरी पाटबंधारे महामंडळाने नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणातील पाण्याची आकडेवारी जाणून घेतली. त्यात जायकवाडीची तूट भरून काढण्यासाठी पाणी सोडावे लागेल, असे महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी ठामपणे सांगितले व प्रसंगी त्यासाठी लवादाकडे तक्रार दाखल करण्याचेही सूतोवाच केले आहे. त्यामुळे पाणी सोडण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत १३ टक्के तर गंगापूर धरणात ११ टक्के पाण्याची कमतरता यंदा निर्माण झाली आहे. गंगापूरमध्ये ८८ टक्के साठा असून, जिल्ह्यातील धरणांमध्ये ७७ टक्के साठा आहे. आॅक्टोबरमध्ये होणारे धरणातील पाण्याचे आरक्षण अद्याप जाहीर झालेले नाही. त्यामुळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, नगरपालिका, रेल्वे आदींसाठी जुलै अखेरपर्यंत पाण्याची तजवीज केल्यानंतर धरणातील उर्वरित पाणी सिंचनासाठी देण्याची तरतूद आहे. यंदा खरीप पिकासाठी अखेरचे आवर्तन न मिळाल्यामुळे तसेच परतीचा पाऊस न आल्यामुळे जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत गंगापूर धरणातून पाणी सोडल्यास त्याचा या धरणावर अवलंबून असलेल्या तालुक्यांमध्ये राज्य सरकारच्या विरोधात वातावरण पेटण्याची चिन्हे आहेत. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर दुसऱ्याच वर्षी सन २०१५ मध्ये जायकवाडी धरणासाठी नगर, नाशिकमधून १२ टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे भाजपा सरकारविरोधात सर्वपक्षीयांनी आंदोलन केले होते. लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असून, यंदा अपु-या पाण्यामुळे जनता होरपळून निघत असताना हक्काचे पाणी पळविल्यास त्याचा विरोधकांकडून निवडणुकीत सत्ताधाºयांच्या विरोधात प्रचार केला जाणार आहे.

टॅग्स :Erai Damइरई धरणNashikनाशिक