रानवड येथे आढळला बेवारस मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 00:04 IST2020-11-24T22:46:11+5:302020-11-25T00:04:40+5:30
रानवड परिसरातील हॉटेल दैवत समोर अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह आढळून आल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. त्या मृतदेहाची अद्याप ओळख पटली नसून वारसाचा पिंपळगाव पोलीस शोध घेत आहे.

रानवड येथे आढळला बेवारस मृतदेह
पिंपळगाव बसवंत : रानवड परिसरातील हॉटेल दैवत समोर अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह आढळून आल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. त्या मृतदेहाची अद्याप ओळख पटली नसून वारसाचा पिंपळगाव पोलीस शोध घेत आहे.
पिंपळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रानवड येथील हॉटेल दैवतसमोर अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह हॉटेलमालक रमाकांत गायकवाड यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तातडीने त्यासंदर्भात पिंपळगाव पोलिसांना कळवले असता त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या अनोळखी व्यक्तीचे अंदाजे वय ३५ ते ४० वर्षे आहे. पुढील तपास पिंपळगावचे सहाय्यक निरीक्षक कुणाल सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रवींद्र झाल्टे, शांताराम निंबेकर करीत आहेत.