The type of three suspects strangled a couple to one and a half crores | तिघा संशयितांनी एका दांपत्याला तब्बल दीड कोटींना गंडा घातल्याचा प्रकार
तिघा संशयितांनी एका दांपत्याला तब्बल दीड कोटींना गंडा घातल्याचा प्रकार

ठळक मुद्देकॅनडा येथे नोकरीसह कायमस्वरूपी विसा उपलब्ध करून देण्याचे आमिष

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : परदेशात नोकरी देण्याचे आमिष दाखवून तिघा संशयितांनी एका दांपत्याला तब्बल दीड कोटींना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शरणपूररोडवरील संशयित नितीन वसंत पाटील, माई वसंत पाटील (रा. निवास रेसिडेन्सी), विजया नितीन सावळे या तिघा संशयितांनी शरद मधुकर वाटपाडे (रा. जनकनगरी, खुटवडनगर) दांपत्याला कॅनडा येथे नोकरीसह कायमस्वरूपी विसा उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखविले होते.
त्यासाठी संशयितांनी त्यांच्याकडून वेळोवेळी ५ लाख ९२ हजार ५०० रुपये वेळोवेळी घेतले.
दरम्यानच्या काळात दांपत्याचे सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यांनी सरकारवाडा पोलिसांत तक्र ार दिली आहे.

Web Title: The type of three suspects strangled a couple to one and a half crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.