सावळ घाटात दोन अपघातात दोन युवक ठार दोन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 01:35 IST2021-01-17T20:52:10+5:302021-01-19T01:35:19+5:30
दिंडोरी : नाशिक पेठ रस्त्यावर अपघातांची मालिका सुरुच असून शनिवारी सावळघाटात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन युवक मयत झाले असुन दोन जण गंभीर जखमी झाले आहे.

सावळ घाटात दोन अपघातात दोन युवक ठार दोन जखमी
दिंडोरी : नाशिक पेठ रस्त्यावर अपघातांची मालिका सुरुच असून शनिवारी सावळघाटात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन युवक मयत झाले असुन दोन जण गंभीर जखमी झाले आहे.
पेठ कडून नाशिक कडे येणारी बस क्र एम एच 07 सी 9433 व नाशिहून पेठ कडे येणारी दुचाकी जिजे 15 बीआर 6560 यांचेत अपघात होत त्यात दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला त्यास ग्रामस्थांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले तर रात्री याच परिसरात झालेल्या घटनेत अज्ञात वाहनाने दुचाकी एमएच 15 एफ वाय 8981 धडक दिल्याने त्यावरील तिघेजण गंभीर जखमी होत ओम सुदाम गाढवे वय 19 रोहिदास सुभाष चारोस्कर वय 22 रा शिंदे ता पेठ हे दोघे तरुण मयत झाले तर किरण कमलाकर चारोस्कर वय 18 हे जखमी झाले त्यांचेवर दवाखान्यात उपचार सुरू आहे दिंडोरी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांचें मार्गदर्शनाखाली हवालदार गायकवाड,पजई आदी तपास करत आहे.