बलात्कार प्रकरणी तरुणाला दोन वर्षाची सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 00:16 IST2018-05-04T00:16:17+5:302018-05-04T00:16:17+5:30
मालेगाव : मुलीला बेशुद्ध होण्याचे औषध पाजून तिच्यावर बलात्कार करून व्हिडीओ क्लिप काढणाऱ्या येथील हिरे गल्लीत राहणाºया शहीद अहमद जाबीद अहमद याला दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा शिक्षा सुनावली आहे.

बलात्कार प्रकरणी तरुणाला दोन वर्षाची सक्तमजुरी
मालेगाव : मुलीला बेशुद्ध होण्याचे औषध पाजून तिच्यावर बलात्कार करून व्हिडीओ क्लिप काढणाऱ्या येथील हिरे गल्लीत राहणाºया शहीद अहमद जाबीद अहमद याला येथील अपर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. ए. एस. एम. अली यांनी दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व २५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी व आयटी अॅक्टप्रमाणे एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. दंडाच्या रकमेतून पीडित मुलीला ३० हजार रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सन २०१२ साली ही घटना घडली होती. हिरे गल्लीत राहणाºया शहीद अहमद याने पीडित मुलीच्या घरी येऊन बलात्कार केला होता. तसेच व्हिडीओ क्लिप दाखवून ब्लॅकमेल केले होते. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यात नऊ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आल्या. सरकारी पक्षातर्फे अॅड. बळवंत शेवाळे यांनी कामकाज पाहिले.