सटाण्यात दोन कामगारांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 02:01 IST2018-12-31T02:00:51+5:302018-12-31T02:01:24+5:30

शेतात पत्राशेडचे काम सुरु असताना विजेचा धक्का लागून दोन कामगार ठार झाले. ही दुर्घटना कोटबेल येथे रविवारी (दि. ३०) दुपारी ४ वाजेच्या दरम्यान घडली.कोटबेल येथील तरु ण पवन सुनिल पवार(१८), शरद राजाराम केदारे (२६) अशी मृतांची नावे आहेत

Two workers die in the crowd | सटाण्यात दोन कामगारांचा मृत्यू

सटाण्यात दोन कामगारांचा मृत्यू

सटाणा : शेतात पत्राशेडचे काम सुरु असताना विजेचा धक्का लागून दोन कामगार ठार झाले. ही दुर्घटना कोटबेल येथे रविवारी (दि. ३०) दुपारी ४ वाजेच्या दरम्यान घडली.कोटबेल येथील तरु ण पवन सुनिल पवार(१८), शरद राजाराम केदारे (२६) अशी मृतांची नावे आहेत
हे दोघे गावातीलच काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष नारायण खैरनार यांच्या शेतात पत्राशेडचे काम करत होते. दुपारी चार वाजेच्या दरम्यान दोघे छतावरून खाली उतरत असतांना अचानक खांबावर पाय पडल्याने खांब विद्युत तारेला लागून दोघांना विजेचा जबरदस्त धक्का लागला. यात ते दोघे जागीच ठार झाले. जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी घटना स्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस हवालदार दिपक भगत, पोलीस नाईक पंकज खैरनार यांनी पंचनामा केला. नामपूर ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला.
फोटो नावे : पवन पवार, शरद केदारे

Web Title: Two workers die in the crowd