शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटीतून मालट्रकसह दोन दुचाकींची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 00:44 IST

शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच असून, पंचवटी परिसरातून मालट्रक, नांदूर नाका व मेनरोडवरून दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली.

नाशिक : शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच असून, पंचवटी परिसरातून मालट्रक, नांदूर नाका व मेनरोडवरून दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली.पंचवटी, आडगाव, सरकारवाडा, भद्रकाली, अंबड, मुंबई नाका अशा सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दररोज एकापेक्षा अधिक घटना घडत आहेत. रासबिहारी-मेरी लिंकरोड भागात राहणारे लक्ष्मण सोनवणे यांच्या मालकीचा मालट्रक (एमएच १५, सीके ४०६३) मंगळवारी चक्क त्यांच्या घरासमोरून चोरट्याने पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुसऱ्या घटनेत आडगाव नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदूर नाका परिसरात राहणारे रघुराम रमेश प्रजापती यांच्या मालकीची दुचाकी स्प्लेंडर (एमएच १५, सीएल ०८६१) अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याचे उघडकीस आले आहे. ही दुचाकीदेखील त्यांच्या राहत्या घरासमोरून चोरी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तिसºया घटनेत मेनरोडवरून प्रकाश नारायण बकरे यांच्या मालकीची स्प्लेंडर (एमएच १५, सीओ १८२५) सकाळी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. तसेच कॉलेजरोडवरील बीवायके महाविद्यालयाच्या आवारातूनदेखील एक दुचाकी चोरी करण्यात आल्याचे समजते. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पंचवटीत५० हजारांची रोकड लंपासपंचवटी : मालेगाव स्टॅन्ड येथील पेट्रोलपंपावरून चिंचबनात पैशांची बॅग पोहोचवण्यासाठी जाणाºया इसमाच्या हातातून पल्सर दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी ५० हजार रुपयांची रोकड हिसकावून पळ काढल्याची घटना घडली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मालेगाव स्टॅन्डवरील एका पेट्रोलपंपावर मदतनीस म्हणून काम करणाºया हिरावाडी येथील चेतन सुरेश चावरे याच्याकडे बुधवारी (दि.१३) रात्री व्यवस्थापक आनंदराव सुर्वे यांनी पेट्रोलपंपावर जमा झालेली रोकड चिंचबनात पोहचविण्यासाठी पाठविले. दरम्यान, एका कापडी बॅगमध्ये रोकड घेऊन दीपज्योती अपार्टमेंटमधील प्रकाश मुनोत यांच्या घरी जाण्यासाठी निघालेल्या चेतन याने रोकडची बॅग अ‍ॅक्टिवाच्या डिक्कीत ठेवली. त्यासोबत दुसरा सहकारी प्रशांत धुळे यालाही घेतले. हे दोघेही चिंचबन परिसरात पोहोचल्यानंतर रस्त्याच्या बाजूला अ‍ॅक्टिवा उभी करून ते रोकड असलेली बॅग मुनोत यांच्याकडे घेऊन जात असताना जॅकेट घातलेले व नाका- तोंडाला रु माल बांधलेले पल्सर गाडीवरून जाणाºया दोघांनी जवळ येऊन हातातील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी या दोघांनी आरडाओरड केली मात्र भामट्यांनी बॅग हिसकावून पळ काढल्याचे फिर्यादीच म्हटले आहे. बॅगमध्ये ५० हजार रुपयांची रोकड असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी