अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 19:39 IST2018-08-14T19:38:50+5:302018-08-14T19:39:02+5:30
सिन्नर : तालुक्यातील कोनांबे फाट्याजवळ दुचाकीचा अपघात होवून एकजण मृत्यू झाल्याची घटना मंगळवार (दि.१४) रोजी दुपारी घडली.

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
सिन्नर : तालुक्यातील कोनांबे फाट्याजवळ दुचाकीचा अपघात होवून एकजण मृत्यू झाल्याची घटना मंगळवार (दि.१४) रोजी दुपारी घडली.
गणेश शिंदे (३२, रा. संगमनेर) येथील असून दुपारी १२.३० च्या सुमारास तो संगमनेरहून स्पेंडर क्र. (एम.एच १७ बी. ए. २७१०) या दुचाकीहून इगतपुरी येथे जात असताना पिकअप क्र. (एम. एच. १५ इ. जी. ८२४६) या वाहनाने मागून धडक दिल्याने धडक दिल्याने शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. शिंदे यांच्या शवविच्छेदनास सिन्नर येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. अज्ञात वाहकाविरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात गुण्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार नितीन मंडलिक आणि बाबा पगारे करत आहे.