अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 00:37 IST2020-07-03T22:43:31+5:302020-07-04T00:37:26+5:30
लोहोणेर - कळवण रस्त्यावर विठेवाडी - भऊर गावादरम्यान असलेल्या शिवनाला वळणावर अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने घाणेगाव (ता. मालेगाव) येथील दुचाकीस्वार सोमनाथ राजेंद्र मोरे डोक्याला जबर मार लागून जागीच ठार झाला.

अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार जागीच ठार
लोहोणेर : लोहोणेर - कळवण रस्त्यावर विठेवाडी - भऊर गावादरम्यान असलेल्या शिवनाला वळणावर अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने घाणेगाव (ता. मालेगाव) येथील दुचाकीस्वार सोमनाथ राजेंद्र मोरे डोक्याला जबर मार लागून जागीच ठार झाला.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घाणेगाव (कौळाणे) ता. मालेगाव येथील सोमनाथ राजेंद्र मोरे (३२) हा युवक दुचाकीने (एमएच १९ बीएच ५०६७) दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान जात असताना विठेवाडी - भऊर गावादरम्यान असलेल्या शिवनाल्यात अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने त्याच्या डोक्याला जबर मार लागून तो जागीच ठार झाला. याबाबत देवळा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनांच्या विरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे़ अपघातानंतर देवळा पोलीस ठाण्याचे हवालदार पी.एन. सोनवणे, पोलीस नाईक परदेशी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मयत सोमनाथ मोरे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी देवळा ग्रामीण रु ग्णालयात हलविण्यात आला. शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचा मृतदेह नातेवाइकाच्या ताब्यात देण्यात आला.