दुचाकीचालकाकडून पोलिसाला धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 00:48 IST2019-04-29T00:46:58+5:302019-04-29T00:48:23+5:30
वाहतूक कोंडीला निमंत्रण देणाऱ्या दुचाकीचालकाला मोटार सुरक्षितठिकाणी हलविण्यास सांगितल्याचा राग येऊन दुचाकीचालकाने कर्तव्य बजावणाºया पोलिसाला धक्काबुक्की केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी संशयित दुचाकीचालकाला अटक केली आहे.

दुचाकीचालकाकडून पोलिसाला धक्काबुक्की
नाशिक : वाहतूक कोंडीला निमंत्रण देणाऱ्या दुचाकीचालकाला मोटार सुरक्षितठिकाणी हलविण्यास सांगितल्याचा राग येऊन दुचाकीचालकाने कर्तव्य बजावणाºया पोलिसाला धक्काबुक्की केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी संशयित दुचाकीचालकाला अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बालाजी हनुमान शिंदे (३२ रा.सावतानगर,सिडको) याने शनिवारी (दि.२७) दुपारी मारुती स्विफ्ट कार (एमएच १५ ईएफ ०६८८) ठक्कर बाजार बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर रस्त्याच्या मध्ये उभी केली होती. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन वाहतुक कोंडीला निमंत्रण मिळत होते. शिंदे हा मोटार सोडून निघून गेलेला होता. यावेळी पोलीस शिपाई अरूण मुरलीधर भोये यांनी चालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता शिंदे याने त्यांच्याशी उद्धटपणे बोलत कर्तव्यावर आक्षेप घेत अंगावर धावून जात धक्काबुक्की केल्याची फिर्याद सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित शिंदे यास अटक केली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक अशोक पाथरे करीत आहेत.
२५ हजारांना गंडा
पंचवटीतीलं त्रिमूर्तीनगर येथे चावी बनविण्याच्या बहाण्याने घरात आलेल्या अनोळखी इसमाने कपाटातून २५ हजार रु पयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरी प्रकरणी त्रिमूर्तीनगर येथे राहणाºया अरविंद सावळीराम खैरनार या ७८ वर्षीय वृद्धाने पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.४ रोजी खैरनार व त्यांच्या पत्नी घरी असताना सकाळी अकरा वाजेच्या सुमारास एक अनोळखी इसम चावी बनवून देण्यासाठी घरी आला त्यावेळी त्याने नजर चुकवून घरातील कपाटात ठेवलेली २५ हजार रुपयांची रोकड लंपास केली.