लासलगाव येथे दुचाकी खाक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 12:39 IST2018-08-07T12:39:14+5:302018-08-07T12:39:31+5:30

लासलगाव : येथे काल मध्यरात्री ब्राम्हणगाव (विंचुर) जोशीवाड येथे दुचाकी जळून खाक झाल्याची घटना घडल्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

 Two wheeler in lasalagaon! | लासलगाव येथे दुचाकी खाक !

लासलगाव येथे दुचाकी खाक !

लासलगाव : येथे काल मध्यरात्री ब्राम्हणगाव (विंचुर) जोशीवाड येथे दुचाकी जळून खाक झाल्याची घटना घडल्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार ब्राम्हणगाव (विंचूर) परिसरातील जोशी वाडा येथील दुचाकी एमएच १५ एफके ४२५६ अ‍ॅक्टिवा कंपनीची ४० हजार रुपये किंमतीची गाडी जळून नुकसान झाले आहे. याप्रकरणी लासलगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोशीवाडा येथील रहिवासी अमोल सुभाष बडाख यांची अ‍ॅक्टिवा सोमवारी मध्यरात्रीच्या दरम्यान यांच्या राहत्या घरा जवळ उभी असलेली गाडी जळून खाक झाली आहे. याप्रकरणी अमोल बडाख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लासलगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास पोनि शिवचरन पांढरे यांच्या मार्गदर्शानाखाली आर.के आहिरे,प्रदीप अजगे,कैलास महाजन तपास करीत आहे.

Web Title:  Two wheeler in lasalagaon!

टॅग्स :Nashikनाशिक