वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2021 23:23 IST2021-10-11T23:22:32+5:302021-10-11T23:23:20+5:30
चांदवड : येथील श्री. नेमिनाथ जैन संस्थेसमोर रविवारी (दि.१०) रात्री साडेसात वाजेच्या सुमारास चांदवडकडे येणारी दुचाकी (एम.एच.१५ एन. ३६१७) हिला मालेगावकडून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यात राजेंद्र दशरथ बडोदे (५५, रा. चांदवड) हे जागीच ठार झाले.

वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
चांदवड : येथील श्री. नेमिनाथ जैन संस्थेसमोर रविवारी (दि.१०) रात्री साडेसात वाजेच्या सुमारास चांदवडकडे येणारी दुचाकी (एम.एच.१५ एन. ३६१७) हिला मालेगावकडून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यात राजेंद्र दशरथ बडोदे (५५, रा. चांदवड) हे जागीच ठार झाले.
दुचाकीवरील दुसरा इसम गंभीर जखमी झाला असून, त्याला चांदवड उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून पिंपळगाव बसवंत येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. याबाबत चांदवड पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजेंद्र बिन्नर हे करीत आहे.