अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 01:14 IST2021-03-18T21:53:13+5:302021-03-19T01:14:50+5:30
सुरगाणा : घाटमाथ्यावरील नागशेवडी फाट्याजवळ अज्ञात कारच्या धडकेत दुचाकीवरील एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात बुधवारी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान झाला.

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
सुरगाणा : घाटमाथ्यावरील नागशेवडी फाट्याजवळ अज्ञात कारच्या धडकेत दुचाकीवरील एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात बुधवारी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान झाला.
तालुक्यातील राशा येथील एकनाथ राजाराम पवार (२१) व हेमंत हरिश्चंद्र पवार (२२) हे दोघेही दुचाकीवर क्र. एमएच १५ डीएन १५६० वरुन बोरगावकडे जात असताना समोरून येणाऱ्या कार व दुचाकी मध्ये अपघात झाला. यामध्ये दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. याप्रसंगी जनार्दन भोये, पांडुरंग पवार, मनोहर चौधरी, तुकाराम भोये, योगेश ठाकरे, झांबरू जोपळे, चैतराम चौधरी, विजय कानडे, नामदेव भोये आदी ग्रामस्थांनी दोघांना सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
मात्र एकनाथच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यास पुढील उपचारासाठी गुजरातमधील वासदा येथे नेत असताना वाटेतच एकनाथचा मृत्यू झाला. कारचालक फरार झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिवाण सिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रकांत दवंगे, प्रभाकर सहारे करीत आहेत. (१८ एकनाथ पवार)