दुभाजकावर आदळून दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2022 01:40 IST2022-05-18T01:40:31+5:302022-05-18T01:40:52+5:30
नांदूर नाक्याकडून जेलरोड सैलानी चौकाच्या दिशेने दुचाकीने तिघे प्रवास करत असताना त्यांच्या दुचाकीसमोर दुपारच्या सुमारास अचानकपणे भटके श्वान आल्यामुळे दुचाकीचालकाचा ताबा सुटला. दुचाकी थेट रस्त्यावरील दुभाजकाला जाऊन धडकली. यामुळे तिघांपैकी एका युवकाचा मृत्यू झाला तर अन्य दोघे गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना मागील बुधवारी घडली.

दुभाजकावर आदळून दुचाकीस्वार ठार
नाशिकरोड : नांदूर नाक्याकडून जेलरोड सैलानी चौकाच्या दिशेने दुचाकीने तिघे प्रवास करत असताना त्यांच्या दुचाकीसमोर दुपारच्या सुमारास अचानकपणे भटके श्वान आल्यामुळे दुचाकीचालकाचा ताबा सुटला. दुचाकी थेट रस्त्यावरील दुभाजकाला जाऊन धडकली. यामुळे तिघांपैकी एका युवकाचा मृत्यू झाला तर अन्य दोघे गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना मागील बुधवारी घडली.
बोधलेनगर येथील रहिवासी निशांत ज्ञानेश्वर उबाळे याने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्याचा भाऊ आकाश उबाळे व त्याचे मित्र विपुल चंद्रमोरे व कुणाल असे तिघे दुचाकीने (एमएच १५ सीआर ५४७४) मागील बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास नांदूर नाक्याकडून जेलरोड सैलानी बाबा चौकाकडे मार्गस्थ होत होते. यावेळी रस्त्यात हा अपघात घडला. कुत्रे अचानकपणे दुचाकीसमोर आल्यामुळे दुचाकीचालक आकाशचा ताबा सुटला आणि दुचाकी दुभाजकावर जाऊन आदळली. आकाश, विपुल, कुणाल हे जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, आकाशवर आडगावच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असताना मंगळवारी (दि. १७) निधन झाले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.