डंपरच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 12:35 IST2020-01-07T12:34:57+5:302020-01-07T12:35:09+5:30
वणी : भरधाव वेगातील डंपरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दूचाकीस्वार जागीच ठार झाला.

डंपरच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
वणी : भरधाव वेगातील डंपरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दूचाकीस्वार जागीच ठार झाला. वणी पिंपळगाव रस्त्यावरील वाघेरा डोंगर परिसरात हा अपघात झाला. रामनाथ काळु पवार राह. मांदाणे, हल्ली राहणार बोरीचा पाडा हे दुचाकीवरु न या मार्गावरु न जात असताना डंपरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात पवार हे जागीच ठार झाले.
.-------------------------
पादचारी महिला ठार
ओझरटाऊनशिप : येथील मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या सायखेडा फाट्यावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत अनोळखी पादचारी महिला जागीच ठार झाली.
काल सांयकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास एक अनोळखी पादचारी महिला ओझर बाजूकडून नाशिकबाजूकडे जाणाऱ्या महामार्गाने जात असतांना सायखेडा फाट्यावरील साईन बोर्ड जवळ अज्ञात वाहनाने महिलेस जोरदार धडक दिल्याने अनोळखी महिला जागीच ठार झाली. या महिलेची उंची साडे चार फुट,रंगाने गोरी,उजव्या हातावर गोंदलेले असुन अंगात हिरवे ब्लाऊज ,पिवळी साडी आहे. या संदर्भात ओझर पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला असुन अधिक तपास सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक बी.आर.बैरागी करीत आहेत.