मन्याड पुलानजीक अपघातात दुचाकीस्वार ठार, एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2021 18:03 IST2021-01-31T18:02:49+5:302021-01-31T18:03:10+5:30
नांदगाव : नांदगांव ते चाळीसगांव रस्त्यावर मन्याड पुलानजीक झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण ठार व एक जण गंभीर जखमी झाला. दुचाकीस्वार डॉक्टरवाडीहून कासारीला जात होता. शुक्रवारी (दि.२९) रात्री सदर अपघात घडला.

मन्याड पुलानजीक अपघातात दुचाकीस्वार ठार, एक गंभीर
नांदगाव : नांदगांव ते चाळीसगांव रस्त्यावर मन्याड पुलानजीक झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण ठार व एक जण गंभीर जखमी झाला. दुचाकीस्वार डॉक्टरवाडीहून कासारीला जात होता. शुक्रवारी (दि.२९) रात्री सदर अपघात घडला. भटू अशोक बारसे (रा. कासारी ता. नांदगांव) यांनी नांदगांव पोलिसात फिर्याद दिली.
अनोळखी वाहनाने धडक दिल्याने, दुचाकीवरील चुलत भाऊ उमेश प्रकाश बारसे (२०) हा जागीच ठार झाला, तर हिरामण बारसे (३५, रा. कासारी) हा गंभीर जखमी झाला. दोघे डॉक्टरवाडीहून कासारी येथे जात असताना मन्याड नदीच्या पुलावर हा अपघात झाला. रात्रीच्या कडाक्याच्या थंडीत लवकर मदत न मिळाल्याने वैद्यकीय उपचारास विलंब झाला. या प्रकरणी अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिल कातकाडे, सहायक पोलीस निरीक्षक दीपक सुरवाडकर व हवालदार सुरेश सांगळे करीत आहेत.