देवळा येथे अपघातात दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 23:37 IST2020-03-07T23:36:20+5:302020-03-07T23:37:37+5:30

देवळा : येथील देवळा-नाशिक रस्त्यावर समृद्धी पेट्रोलपंपासमोर शुक्रवारी (दि.६) रात्री दुचाकीला मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात येथील युवक अभय नंदकिशोर रौंदळ (वय २३) याचा मृत्यू झाला, तर एकजण जखमी झाला. नुकताच नोकरीला लागलेल्या कर्त्या मुलाच्या निधनाने देवळा व भेंडी (ता.कळवण ) या मूळ गावी हळहळ व्यक्त केली जात आहे.

Two-wheeler killed in accident at Deola | देवळा येथे अपघातात दुचाकीस्वार ठार

अभय नंदकिशोर रौंदळ

ठळक मुद्दे अभय व त्याचा मित्र हे दोघे यामाहा मोटारसायकलने नाशिकहून देवळ्याला येत होते.

देवळा : येथील देवळा-नाशिक रस्त्यावर समृद्धी पेट्रोलपंपासमोर शुक्रवारी (दि.६) रात्री दुचाकीला मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात येथील युवक अभय नंदकिशोर रौंदळ (२३) याचा मृत्यू झाला, तर एकजण जखमी झाला. नुकताच नोकरीला लागलेल्या कर्त्या मुलाच्या निधनाने देवळा व भेंडी (ता.कळवण ) या मूळ गावी हळहळ व्यक्त केली जात आहे.
देवळा एज्युकेशन संस्थेतील माध्यमिक शिक्षक नंदकिशोर रौंदळ यांचा मुलगा अभय व त्याचा मित्र हे दोघे यामाहा मोटारसायकलने नाशिकहून देवळ्याला येत होते. रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास येथील समृद्धी पेट्रोलपंपासमोर एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात अभयच्या छातीला जोराचा मार लागला. समृध्दी पेट्रोलपंपाचे संचालक विजय पगार, रिंकू पगार व कर्मचारी तातडीने मदतीसाठी धावून आले. त्यांनी दोघा जखमींना तातडीने देवळा येथील ग्रामीण
रु ग्णालयात हलविले .परिस्थिती गंभीर असल्यामुळे अभयला मालेगाव येथे अधिक उपचारासाठी नेले असता तो मृत झाल्याचे सांगण्यात आले. देवळा येथील अमरधाममध्ये शनिवारी सकाळी शोकाकुल वातावरणात अभयवर अंत्यसंस्कार करण्यात आले. रौंदळ कुटुंबीय मूळ भेंडी (ता.कळवण) येथील असून ते सध्या देवळा येथे वास्तव्यास आहेत. देवळा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक एस. आर. राठोड करीत आहेत . तीन वर्षापूर्वी रौंदळ यांची कन्येचा आकस्मिक मृत्यू झाल्याने हे कुटुंब दु:खात होते. आता या कुटुंबीयांना मुलाच्या निधनाचा मोठा धक्का बसला आहे.

Web Title: Two-wheeler killed in accident at Deola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.