नाशिक : इंदिरानगर परिसरातील काका ढाब्यासमोर एका कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि.१) सायंकाळी सव्वाचार वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीणचंद्र दत्ताराम देठे (५३, रा. पाथर्डी फाटा) दुचाकी (एमएच१५, सीसी ८५९३) वरून चढ्ढा चौकाकडून सर्व्हिसरोडने इंदिरानगर बोगद्याकडे जात असताना काका ढाब्यासमोर पांढऱ्या रंगाच्या चारचाकीच्या चालकाने भरधाव वेगात चालवून चार्वाक चौकाकडून चढ्ढा चौकाकडे जात असताना अचानक टर्न घेतल्याने प्रवीणचंद्र देठे यांच्या दुचाकीस धडक दिल्याने त्याच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे.
कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 00:56 IST