दुचाकींची समोरासमोर धडक; एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:14 AM2021-04-01T04:14:46+5:302021-04-01T04:14:46+5:30

-------------- अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या विरुद्ध गुन्हा मालेगाव : शहरालगतच्या चंदनपुरी यात्रा चंदनपुरी येथून अल्पवयीन मुलीला पळवून नेणार्‍या विशाल ...

Two-wheeler head-on collision; One injured | दुचाकींची समोरासमोर धडक; एक जखमी

दुचाकींची समोरासमोर धडक; एक जखमी

Next

--------------

अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या विरुद्ध गुन्हा

मालेगाव : शहरालगतच्या चंदनपुरी यात्रा चंदनपुरी येथून अल्पवयीन मुलीला पळवून नेणार्‍या विशाल नाना सोनवणे याच्याविरुद्ध किल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या अल्पवयीन मुलीला काहीतरी फूस लावून विशाल याने पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खरगे हे करीत आहेत.

--------------

विवाहितेचा छळ

मालेगाव : व्यवसायासाठी माहेरून २५ लाख रुपये आणावेत म्हणून शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या पतीसह अन्य दोघा जणांविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मयुरी मंदार खैरनार या विवाहितेने फिर्याद दिली आहे. व्यवसायासाठी पैसे आणावेत म्हणून शारीरिक व मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास हवालदार जगताप करीत आहेत.

------------------

मालेगावी शहरातून दोन दुचाकी लंपास

मालेगाव : शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच आहे. रमजानपूर व छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी एक दुचाकी चोरीला गेली आहे. रमजानपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या अनिल हरी शिंदे यांची वीस हजार रुपये किमतीची दुचाकी क्रमांक एमएच ४१ क्यू ७०२२ ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याप्रकरणी पुढील तपास हवालदार सूर्यवंशी हे करीत आहेत. छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २० हजार रुपये किमतीची मुझफ्फर खान करीद खान यांच्या मालकीची दुचाकी क्रमांक एमएच ४१ एस ४७८९ ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याप्रकरणी मुझफ्फर खान यांनी छावणी पोलिसात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बसत्ते हे करीत आहेत.

Web Title: Two-wheeler head-on collision; One injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.