शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

दुर्दैवी : वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार मित्रांचा मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 14:45 IST

दोघे तरुण या अपघातात मृत्यूमुखी पडल्यामुळे या परिसरात ऐन दिपावलीच्या तोंडावर शोककळा पसरली.

ठळक मुद्देटाकळीरोडवर शोककळा; रिंगरोडवर अपघात

पंचवटी : औरंगाबाद महामार्गावरुन तपोवनमार्गे थेट टाकळी गावात जाणाऱ्या रिंगरोडवर मिर्ची चौफुलीलगतच्या सिग्नलवरुन भरधाव जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार दोघा मित्रांचा मृत्यू झाला. रविववारी (दि.८) रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. याप्रकरणी आडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.टाकळी रोडवरील इंद्रायणी कॉलनीतील राहणारा रोहित संजय पिंगळे (२९) व त्याचा राहुलनगर येथील मित्र अतुल अशोक शिंदे (२९) हे दोघे त्यांच्या यामाहा एफझेड दुचाकीने (एम.एच.१५ जीडी ९७१५) मार्गस्थ होत असताना एका भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दोघांना गंभीर मार लागला. रोहितच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. अतुलला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरु असताना त्याची प्राणज्योत मालवली. इंद्रायणी कॉलनी, राहुलनगरमधील दोघे तरुण या अपघातात मृत्यूमुखी पडल्यामुळे या परिसरात ऐन दिपावलीच्या तोंडावर शोककळा पसरली. अचानकपणे झालेल्या या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शिंदे व पिंगळे कुटुंबियांनी तरुण मुले गमावल्याने या कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी पुढील तपास हवालदार लोहकरे करीत आहेत.-- 

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसAccidentअपघातDeathमृत्यू