शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

दुभाजकावर दुचाकी आदळून विद्यार्थी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 22:03 IST

भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळून झालेल्या भीषण अपघातात तुमसर येथील महाविद्यालयीन विद्यार्थी जागीच ठार झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील खरबी नाका येथे मंगळवारी पहाटे २.३० वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देमृत तुमसरचा : खरबी नाक्यावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळून झालेल्या भीषण अपघातात तुमसर येथील महाविद्यालयीन विद्यार्थी जागीच ठार झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील खरबी नाका येथे मंगळवारी पहाटे २.३० वाजताच्या सुमारास घडली.मंगेश हिरालाल बडवाईक (२७) रा.विनोबा नगर तुमसर असे मृताचे नाव आहे. तर दीपक तितीरमारे (२७) रा.श्रीराम नगर तुमसर आणि राहुल सार्वे (२१) रा.मोहाडी असे जखमींची नावे आहेत. मंगेश बडवाईक आपल्या दोन मित्रांसह दुचाकी क्रमांक एमएच ३६ एडी ६१२८ ने कॅट्रीनचे सामान खरेदीसाठी नागपूर येथे जात होते. परंतु रस्त्यात त्यांनी आपला बेत रद्द केला. मौदा येथे रात्री एका हॉटेलमध्ये भोजन केले आणि परत तुमसरकडे ते दुचाकीने निघाले. खरबी नाका शिवारात त्यांची दुचाकी अनियंत्रीत होऊन दुभाजकावर आदळली. त्यात मंगेश बडवाईक गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. तर दीपक व राहुल गंभीर जखमी झाले. सध्या त्यांच्यावर भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मंगेश बडवाईक हा आॅरेंज सिटी कॉलेजमध्ये समाजकार्य पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाला होता. अभ्यासात हुशार असलेल्या मंगेशच्या मृत्यूने तुमसर शहरात हळहळ व्यक्त होत आहे. गत पाच महिन्यात तुमसर शहरातील दोघांचा अपघाती मृत्यू झाला.