सिन्नर-घोटी मार्गावर दोन वाहनांचा अपघात, एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 17:55 IST2019-06-26T17:55:01+5:302019-06-26T17:55:13+5:30
सिन्नर : सिन्नर-घोटी मार्गावर खापराळे शिवारात टाटा मॅजिक आणि टेलरमध्ये झालेल्या भीषण अपघातात मॅजिकचा चालक जागीच ठार झाला. ही घटना रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली.

सिन्नर-घोटी मार्गावर दोन वाहनांचा अपघात, एक ठार
सिन्नर : सिन्नर-घोटी मार्गावर खापराळे शिवारात टाटा मॅजिक आणि टेलरमध्ये झालेल्या भीषण अपघातात मॅजिकचा चालक जागीच ठार झाला. ही घटना रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली.
हॉटेल साई मारीया जवळ हा अपघात झाला. त्यात धनाजी बजरंग गाढवे (३५, रा. धामणगाव) यांचा मृत्यू झाला. सोमवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास गाढवे टाटा मॅजिक घेवून सिन्नरहून घोटीकडे जात होते. याचवेळी समोरून भरधाव वेगात आलेल्या टेलरने (एमएच-२३, एयू-१४७७) त्यांच्या टाटा मॅजिक (एमएच-१५, डीएम-१४७८) ला जोराची धडक दिली. या अपघातात मॅजिकचा चक्काचूर झाला. दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच कोनांबे येथील भरत राजाराम डावरे यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.