शहाद्याहून चोरलेल्या दोन दुचाकी मालेगावी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 23:05 IST2018-11-29T23:05:05+5:302018-11-29T23:05:24+5:30

मालेगाव : येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नंदूरबार जिल्ह्यातील शहाद येथून चोरलेल्या दोन दुचाकी जप्त केल्या असून याप्रकरणी जुनेद उर्फ मोहंमदिन बेलदार रा. शहादा याला अटक केली. त्याला मालेगाव शहरातील पंचशीलनगर येथून ताब्यात घेण्यात आले आहे. चोरलेल्या दुचाकी मालेगावात विक्री करण्याच्या उद्देशाने तो आला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

Two two-wheelers stolen from Shaadya confiscate Malegaon | शहाद्याहून चोरलेल्या दोन दुचाकी मालेगावी जप्त

शहाद्याहून चोरलेल्या दोन दुचाकी मालेगावी जप्त

ठळक मुद्देजप्त केलेल्या दोन्ही दुचाकी किंमत ५५ हजार शहादा पोलिसांकडे पुढील कारवाईसाठी ताब्यात देण्यात आल्या.

मालेगाव : येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नंदूरबार जिल्ह्यातील शहाद येथून चोरलेल्या दोन दुचाकी जप्त केल्या असून याप्रकरणी जुनेद उर्फ मोहंमदिन बेलदार रा. शहादा याला अटक केली. त्याला मालेगाव शहरातील पंचशीलनगर येथून ताब्यात घेण्यात आले आहे. चोरलेल्या दुचाकी मालेगावात विक्री करण्याच्या उद्देशाने तो आला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी रात्री शहर परिसरात पेट्रोलिंग करीत असताना पंचशिलनगरातील धम्म चौकात छापा टाकला असता आरोपी जुनेद उर्फ मोहंमदिन बेलदार याचेकडे चोरीची स्पलेंडर प्लस व हिरो होंडा या दोन दुचाकी मिळून आल्या.
सदर दुचाकी नंदूरबार जिल्ह्यातील शहादा येथून चोरल्याची कबुली त्याने दिली. जप्त केलेल्या दोन्ही दुचाकी किंमत ५५ हजार शहादा पोलिसांकडे पुढील कारवाईसाठी ताब्यात देण्यात आल्या.
सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप दूनगहू, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील अहिरे, हवालदार राजू मोरे, वसंत महाले, पोलीस नाईक देवा गोविंद, राकेश उबाळे, पोलीस कर्मचारी फिरोज पठाण, रतिलाल वाघ, गणेश नरवटे यांनी ही कारवाई केली.

Web Title: Two two-wheelers stolen from Shaadya confiscate Malegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.