शहरातून रिक्षासह दोन दुचाकी गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 00:56 IST2020-10-19T00:56:22+5:302020-10-19T00:56:42+5:30
दोन दुचाकींसह एक ॲटोरिक्षा चोरीला गेल्याप्रकरणी शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शुक्रवार (दि. १६) नांदूरनाका परिसरातून रिक्षा चोरीला गेली. याप्रकरणी उत्तम काळू कुंभारकर (वय २८, रा. मांगीरबाबा मंदिर, नांदूरनाका) याने आडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उत्तम याने त्याची रिक्षा (एमएच १५ एफयू ४७७१) मांगीरबाबा मंदिर परिसरात उभी केली होती. तसेच मॉडेल कॉलनी, जेहान सर्कल परिसरात उभ्या केलेल्या दोन दुचाकी अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्या.

शहरातून रिक्षासह दोन दुचाकी गायब
नाशिक : दोन दुचाकींसह एक ॲटोरिक्षा चोरीला गेल्याप्रकरणी शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शुक्रवार (दि. १६) नांदूरनाका परिसरातून रिक्षा चोरीला गेली. याप्रकरणी उत्तम काळू कुंभारकर (वय २८, रा. मांगीरबाबा मंदिर, नांदूरनाका) याने आडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उत्तम याने त्याची रिक्षा (एमएच १५ एफयू ४७७१) मांगीरबाबा मंदिर परिसरात उभी केली होती. तसेच मॉडेल कॉलनी, जेहान सर्कल परिसरात उभ्या केलेल्या दोन दुचाकी अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्या.
याप्रकरणी प्रकाश सुभाष त्रिभुवन (वय ४५, रोहित हाइट्स ) यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्रिभुवन यांनी त्यांनी त्यांची दुचाकी (एमएच १५ बीटी २२४७) रोहित हाइट्स येथे पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने मोटारसायकल चोरून नेली. त्रिमुर्ती चौक परिसरातूनही अज्ञात चोरट्याने फिर्यादी संदीप सुभाष कुमावत (वय ३०, रा. पंडितनगर) यांची मोटारसायकल चोरून नेली.