शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षक भिंतीसाठी दोन-दोन प्रस्ताव

By admin | Updated: August 5, 2014 01:55 IST

संरक्षक भिंतीसाठी दोन-दोन प्रस्ताव

 

नाशिक : जुन्या नाशकातील काझीच्या गढीवरून राजकारण रंगले असले, तरी आपण राष्ट्रवादीच्या स्थानिक नगरसेवकांना बोलावून सर्वसमावेशक निर्णय घेतला. त्यानंतर रविवारी गढीवर जाऊन एका आमदाराने राजकारण सुरू केले, असा दावा महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनी केला. इतकेच नव्हे, तर गढीला संरक्षक भिंत बांधण्यासाठी महापालिका तयार असून, त्यानुसार माती परीक्षणाच्या निविदा मागविल्या आहेत, असे स्पष्टीकरण दिले. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे आमदार आणि नगरसेवकांनी पाटबंधारे विभागामार्फत संरक्षक भिंत बांधण्याची यापूर्वीच माहिती दिल्याने भिंत नक्की कोण बांधणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.काझीची गढी येथे संरक्षक भिंत बांधण्याच्या मागणीसाठी स्थानिक नागरिकांनी हट्ट धरला असून, स्थलांतरास नकार दिला आहे. त्यानंतर रविवारी नागरिकांनी गढीवरच ठिय्या आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार जयंत जाधव आणि नगरसेवक विनायक खैरे व रंजना पवार यांनी महापौरांवर राजकारण केल्याचा आरोप केला होता. तथापि, महापौरांनी आरोप फेटाळला. शनिवारी राष्ट्रवादीचे दोन्ही नगरसेवक आणि गाडगे महाराज धर्मशाळेचे विश्वस्त, पालिकेचे अधिकारी अशी संयुक्त बैठक आपण घेतली. त्यावेळी रविवारपासून नागरिकांना अन्यत्र स्थलांतरित करण्याचे ठरले होते; परंतु रविवारी गढीवर एक आमदार आले आणि राजकारण सुरू झाले. आपल्या वतीने कोणतेही राजकारण केले गेले नाही, असे सांगून महापौर अ‍ॅड. वाघ यांनी सांगितले की, गेल्या नोव्हेंबर महिन्यात गढी ढासळल्यानंतरच महापालिकेने गढीला संरक्षक भिंत बांधण्याची तयारी केली होती. परंतु नंतर शासन ही भिंत बांधणार असल्याचे सांगण्यात आले. तरीही महापालिकेने माती परीक्षणासाठी निविदा मागविल्या; परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. आता पुन्हा निविदा मागविल्या आहेत. महापालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेत गढीच्या परिसरातील नगरसेवकांनी संरक्षक भिंत बांधण्यासाठी कोणत्याही प्रकारे निधीची मागणी केली नाही तरीही अंंदाजपत्रकात स्वत:हून पाच कोटी रुपयांची तरतूद केल्याचे सांगितले. त्यामुळे महापालिकेचीदेखील भिंत बांधण्याची तयारी सुरू असल्याचे महापौरांनी सांगितले. (प्रतिनिधी)