येवल्यातून दोन तलवारी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 00:23 IST2020-11-25T00:22:43+5:302020-11-25T00:23:30+5:30
येवला शहरातील आनंद नगर भागातून नाशिक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन तलवारी जप्त केल्या आहेत.

येवल्यातून दोन तलवारी जप्त
येवला : शहरातील आनंद नगर भागातून नाशिक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन तलवारी जप्त केल्या आहेत. सोमवारी (दि. २३) रात्री गस्तीदरम्यान पथकाला शहरातील आनंदनगर भागात एका संशयिताच्या घरी विनापरवाना तलवारी असल्याची माहिती मिळाली. पथकाने टाकलेल्या छाप्यात संशयिताच्या घरातील स्वयंपाकघरातून तीन हजार रुपये किमतीच्या दोन तलवारी सापडल्या. संशयित अक्षय श्रीकांत पाठक यास पथकाने ताब्यात घेऊन तलवारी जप्त केल्या. पोलीस निरीक्षक संजीवकुमार सोने यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई केली. या प्रकरणी विनापरवाना शस्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे. शहरासह तालुका परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने गुन्हेगार शोध मोहीम सुरू आहे.
-----------