देवळालीतून दोघा संशयितांची धिंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 00:26 IST2019-01-24T00:26:05+5:302019-01-24T00:26:26+5:30

देवळालीगाव येथे आठ दिवसांपूर्वी शेकोटीचा धूर झाला, या कारणावरून शिवीगाळ करून घराच्या दरवाजावर तलवारीने मारून दहशत माजविणाऱ्या दोघा संशयितांची पोलिसांनी धिंड काढली.

 Two suspects from Deolali | देवळालीतून दोघा संशयितांची धिंड

देवळालीतून दोघा संशयितांची धिंड

नाशिकरोड : देवळालीगाव येथे आठ दिवसांपूर्वी शेकोटीचा धूर झाला, या कारणावरून शिवीगाळ करून घराच्या दरवाजावर तलवारीने मारून दहशत माजविणाऱ्या दोघा संशयितांची पोलिसांनी धिंड काढली. याबाबत अधिक माहिती अशी की, देवळालीगावात गेल्या मंगळवारी रात्री शेकोटीचा धूर झाला, या कारणावरून उद्देश चंदेल, राहुल निकम, किशोर निकम, बाबू मणियार यांनी वर्मा याला शिवीगाळ करून घराच्या दरवाजावर तलवारीने मारून जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे पोलिसांनी याबाबत कारवाई केली.  याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते व पोलिसांनी संशयित उद्देश चंदेल, राहुल निकम यांना पकडून बुधवारी सायंकाळी देवळाली गावातून धिंड काढली.

Web Title:  Two suspects from Deolali