राहुड घाटात रसायनांचा टॅँकर उलटून दोन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 00:53 IST2019-02-08T00:53:10+5:302019-02-08T00:53:59+5:30
चांदवड : तालुक्यातील राहुड घाटात गुरूवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मुंबईकडून मालेगावकडे जाणारा रसायन घेऊन जाणारा टॅँकर (क्रमांंक एम.एच.०४/ डी.एस. ४७५७) हा अचानक डिव्हाडरवर धडकून उलटला. या अपघातात दोघे जखमी जाले असून काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

राहुड घाटाच्या पायथ्याशी उलटलेला रसायनांचा टॅँकर.
ठळक मुद्देअपघातानंतर टॅँकरमधील बरेचसे रसायन रस्त्यावर पडून वाहून गेले
चांदवड : तालुक्यातील राहुड घाटात गुरूवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मुंबईकडून मालेगावकडे जाणारा रसायन घेऊन जाणारा टॅँकर (क्रमांंक एम.एच.०४/ डी.एस. ४७५७) हा अचानक डिव्हाडरवर धडकून उलटला. या अपघातात दोघे जखमी जाले असून काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. अपघातानंतर टॅँकरमधील बरेचसे रसायन रस्त्यावर पडून वाहून गेले . यामध्ये टॅँकर चालक राजकुमार संतुपाल (२८) व क्लिनर सतिशकुमार धर्मराज पाल (१९) रा. उत्तरप्रदेश हे दोघेही जखमी झाले . त्यांच्यावर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात औषधोपचार करण्यात आले. चांदवड पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.