दोघा पादचाऱ्यांना मोटारीने चिरडणा-या चालकाला ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 20:33 IST2020-05-11T20:33:04+5:302020-05-11T20:33:27+5:30

अपघातात ठार झालेल्या युवतीचे नाव उषा काशिनाथ इंगळे (२३,रा.गुलमोहर सोसा. शिंगाडातलाव) असे आहे. मयत पुरूषाची अद्याप ओळख पटू शकलेली नाही

Two pedestrians were handcuffed to the driver of the car | दोघा पादचाऱ्यांना मोटारीने चिरडणा-या चालकाला ठोकल्या बेड्या

दोघा पादचाऱ्यांना मोटारीने चिरडणा-या चालकाला ठोकल्या बेड्या

ठळक मुद्देचालक शुभम भाऊसाहेब सोनवणे याला अटक

नाशिक : पेठरोडवरील दिंडोरीनाक्याजवळ एका चौफूलीच्या ठिकाणी निमाणीकडे जाणा-या एका भरधाव कारने रस्त्यावरून पायी जाणारे महिला, पुरूषाला पाठीमागून धडक देत चिरडल्याची घटना रविवारी (दि.९) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली होती. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून वाहन घेऊन फरार झाला होता; मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून अखेर त्या कारचालकाला पंचवटीतील टकलेनगरमधून अटक केली. या

अपघातात ठार झालेल्या युवतीचे नाव उषा काशिनाथ इंगळे (२३,रा.गुलमोहर सोसा. शिंगाडातलाव) असे आहे. मयत पुरूषाची अद्याप ओळख पटू शकलेली नाही. अपघात प्रकरणी पोलिसांनी जुना आडगाव नाका भागातील टकलेनगर येथे राहणारा चालक शुभम भाऊसाहेब सोनवणे याला अटक केली आहे.
दिंडोरी नाक्याकडून पेठफाट्याकडे पायी जाणा-या उषा इंगळे व एका पुरुषाला भरधाव वेगाने धावणा-या कारने (एमएच १५ ई.बी ४०१९) धडक दिल्याने दोघे वाहनाखाली चिरडले जाऊन जागीच ठार झाले होते. या अपघातप्रकरणी पंचवटी पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा सोनवणे यास ताब्यात घेतले. अपघातात मयत झालेल्या व्यक्तींची ओळख सुरूवातीला पटलेली नव्हती. ठार झालेल्या महिलेची जरी ओळख पटली असली तरी अद्याप पुरूषाची ओळख पटलेली नाही. त्याच्या डोक्यावर अर्धवट टक्कल, केस तांबडे मळलेला पांढरा शर्ट, राखाडी रंगाची पॅन्ट असे वर्णन पोलिसांनी सांगितले.

 

Web Title: Two pedestrians were handcuffed to the driver of the car