सामाजिक बांधिलकी जपत दिले दोन ऑक्सीजन मशीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 00:48 IST2021-05-11T22:41:45+5:302021-05-12T00:48:54+5:30
लासलगाव : कोरोना आजाराचा वाढत चाललेला प्रादुर्भाव व ऑक्सीजन मिळविण्यासाठी अनेकांना करावी लागत असलेली धावपळ लक्षात घेऊन येथील सामाजिक कार्यकर्ते ओम चोथानी वाढदिवस साजरा न करता यांनी दहा लिटर क्षमतेचे दोन ऑक्सीजन मशीन लासलगावकरांच्या सेवेत दाखल केले आहे.

ओम चोथाणी यांनी ऑक्सीजन मशीन लोकार्पण करतांना राहुल वाघ, डॉ. विलास कांगणे, प्रतिक चोथानी, मयुर बोरा, विशाल पालवे, सुरज नाईक, सागर चोथानी, व्यंकटेश दायमा, सुरज आब्बड, मिरान पठान, नीलेश देसाई, कैलास महाजन, प्रदीप आजगे आदी.
लासलगाव : कोरोना आजाराचा वाढत चाललेला प्रादुर्भाव व ऑक्सीजन मिळविण्यासाठी अनेकांना करावी लागत असलेली धावपळ लक्षात घेऊन येथील सामाजिक कार्यकर्ते ओम चोथानी वाढदिवस साजरा न करता यांनी दहा लिटर क्षमतेचे दोन ऑक्सीजन मशीन लासलगावकरांच्या सेवेत दाखल केले आहे.
सध्या कोरोनाच्या काळात अनेक लोक सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा न करता ओम चोथानी व त्यांची मित्र कंपनी देखील कोरोना सुरू झाल्यापासून लासलगाव व परिसरातील नागरिकांच्या मदतीसाठी धावून जात आहेत.
अनेक रुग्णांना नाशिक येथे रुग्णालयापर्यंत पोहचविणे,ऑक्सिजन सुविधा पुरविणे, इंजेक्शन उपलब्ध करून देणे, अनेक गोरगरीब नागरिकांना मदत करण्याचे काम त्यांच्या मित्र मंडळाकडून सुरू आहे.
ओम चोथाणी यांनी या मशीनचे लोकार्पण नुकतेच लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या हस्ते पोलीस कार्यालयाच्या आवारात करण्यात आले. यावेळी लासलगाव डॉक्टर असोशियनचे माजी अध्यक्ष डॉ. विलास कांगणे, प्रतिक चोथानी, मयुर बोरा, विशाल पालवे, सुरज नाईक, सागर चोथानी, अभिजीत जाधव, व्यंकटेश दायमा, सुरज आब्बड, मिरान पठान, नीलेश देसाई, कैलास महाजन, प्रदीप आजगे आदी उपस्थित होते.